Nashik: येवल्यातील भुयारी गटार योजनेस 52 कोटी 46 लाखांचा निधी मंजूर; कधी होणार काम सुरू?

येवला येथील भूमिगत गटार योजनेसाठी 52 कोटी 46 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये 44 कोटी 60 लाखांचा वाटा राज्यशासन उचलणार असून 7.86 कोटी रुपये नगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येणार आहेत.

Nashik: येवल्यातील भुयारी गटार योजनेस 52 कोटी 46 लाखांचा निधी मंजूर; कधी होणार काम सुरू?
प्रातिनिधिक छायाचित्र.
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 11:21 AM

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या येवला येथील भुयारी गटार योजनेस (underground sewerage scheme) तब्बल 52 कोटी 46 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानत रखडलेल्या मलनिस्सारण प्रकल्प योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच या योजनेचे झालेले काम वगळता इतर योजनेसाठी निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू करण्यात येणार आहे. याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेसाठी निधी मिळावा म्हणून राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रयत्न केले आहेत. या योजनेसाठी निधी द्यायला केंद्रानेही पाठ फिरवली होती. शिवाय मधल्या काळात सत्ताबदल झाल्याने हे काम ठप्प झाले होते. आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारच्या काळात या कामाने वेग घेतल्याचे समोर येत आहे. लवकरच हे काम मार्गी लागणार आहे.

केंद्राची निधीस मंजुरी, पण…

आघाडी सरकारच्या काळात मंत्री छगन भुजबळ आणि तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांच्या प्रयत्नातून येवला शहराच्या भुयारी गटार योजनेस 24 डिसेंबर 2014 अन्वये केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन कार्यक्रमांतर्गत 47.30 कोटींची मंजुरी मिळालेली होती. या योजनेस केंद्र शासनाचे 80% महाराष्ट्र शासनाचे 10% तर नगरपालिकेचा 10 टक्के स्वहिस्सा प्रमाणे अनुदान होते. योजनेस महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय मंजुरी समितीने मान्यताही दिलेली होती, तसेच केंद्र शासनाच्या शहरी विकास मंत्रालयाने केंद्राचे 80% प्रमाणे 3,784.01 लाख हे अर्थसहाय्य वितरित करण्यास मंजुरी दिली होती.

जवळपास 35 टक्के पूर्ण

योजनेचा फायदा नागरिकांना त्वरित व्हावा म्हणून नगरपालिकेने निविदा काढून फेब्रुवारी 2014 मध्ये काम सुरू करण्याचे आदेश दिले. हे काम जवळपास 35 टक्के पूर्ण झाले होते. एक ते सव्वा वर्ष कालावधीत जवळजवळ 13 कोटींचे काम झाले. केंद्र व शासनाचा निधी न आल्यामुळे नगरपालिकेने पहिले दोन देयके स्वनिधीतून अदा केली, परंतु केंद्र शासनाने अचानक जेएनएनआरयूएम कार्यक्रम रद्द करून पूर्वीचा निधी वितरीत न झालेल्या योजना रद्द केल्या. यातील काही योजना अमृत अभियानात समाविष्ट केल्या गेल्या. मात्र, मधल्या काळात सत्ताबदल झाल्याने या योजनेचे काम ठप्प झाले होते. याबाबत न्यायालयात याचिका देखील कंत्राटदाराने दाखल केली होती.

भुजबळांनी केले प्रयत्न…

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. कोरोनाच्या काळात विकासाची कामे थांबल्याने या योजनेला ब्रेक लागलेला होता. आता कोरोनाचा प्रसार कमी होऊन पुन्हा एकदा विकासाची कामे जलद गतीने सुरू झाली असून येवला शहर भुयारी गटार योजनेस शासनाची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे येवला शहरातील सांडपाणी व्यवस्थापन व स्वच्छतेस अधिक मदत होणार आहे.

उर्वरित प्रकल्पास मंजुरी

राज्यातील नागरी भागात मुलभूत पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढविण्याकरिता संदर्भाधीन शासन निर्णयाच्या तरतुदीन्वये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत येवला नगरपरिषदेचा मलनिस्सारण प्रकल्पाचा प्रस्ताव राज्यस्तरीय मान्यता समितीकडे मान्यतेकरीता सादर करण्यात आला होता. यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचा पाठपुरावा सुरू होता. त्याअनुषंगाने सदर प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या प्रकल्पास महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत सादर करण्यात आलेल्या येवला मलनिस्सारण प्रकल्पास शासन निर्णयातील अटी व तरतुदीच्या व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिलेल्या तांत्रिक मान्यतेच्या अधीन राहून जे काम पूर्वीच झाले आहे ते वगळून उर्वरित प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे.

तीन महिन्यांत काम सुरू

योजनेसाठी 52 कोटी 46 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये 44 कोटी 60 लाखांचा वाटा राज्यशासन उचलणार असून 7.86 कोटी रुपये नगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येणार आहेत. सदर योजनेचे कामाची निविदा सात दिवसाच्या आत काढून तीन महिन्यांच्या आत या योजनेचे काम सुरू करण्याच्या अटी शर्थी घालण्यात आलेल्या आहेत. तसेच योजनेचे काम वेळेत पूर्ण करून यासाठी त्रयस्थ तांत्रिक परीक्षण करून कामाची नियमित तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच येवला शहर स्वच्छ सुंदर होण्यास मदत होणार आहे. इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.