नाशिक जिल्ह्यात कोरोनाबळींची संख्या वाढतीच, सर्वाधिक कोरोनाबळी मालेगावात
आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 53 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली (Malegaon Corona Death) आहे.
नाशिक : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली (Malegaon Corona Death) आहे. आता नाशिक जिल्ह्यात अनेक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाची धास्ती वाढली आहे. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 53 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. नाशिक जिल्ह्यातील (Malegaon Corona Death) कोरोनाग्रस्तांनी आता हजाराचा आकडा गाठला आहे. नाशिक शहरात आणखी 15 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यातील 10 जण हे नाशिक शहरातील आहेत. तर सिन्नर तालुक्यातील 3, जिल्ह्याबाहेरील दोघांचा यात समावेश आहे.
या वाढत्या आकड्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहे. मालेगावनंतर आता शहरात रुग्णसंख्येचा वेग वाढला आहे. त्यामुळे आता कोरोना रोखणं प्रशासनासमोर मोठं आवाहन आहे. त्यात दिवसागणिक मृत्यूची संख्या वाढू लागली आहे. नाशिक जिल्ह्यात 53 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाबळींचा आकडा
नाशिक ग्रामीण – 01 नाशिक मनपा – 05 मालेगाव मनपा – 45 जिल्ह्याबाहेरील – 02
नाशिक शहरातील वाढती रुग्ण संख्या असतानाही प्रशासनाने अर्थचक्र सुरु व्हावं म्हणून व्यावसायिकांना शिथिलता दिल्याने शहरात गर्दीच प्रमाण वाढू लागलं आहे. अनेक नागरिक हे घराबाहेर फिरतात. यावर मात्र पोलीस प्रशासन ही कारवाई करताना दिसत नाही. कोरोनाची लक्षण दिसल्यास तात्काळ उपचार घ्या तपासून घ्या असं आरोग्य विभाग वारंवार सांगत आहे. मात्र तरीही नागरिक लक्ष देत नाहीत आणि शेवटच्या टप्प्यात रुग्ण उपचारासाठी येत असल्याने मृत्यू संख्या वाढत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
त्यामुळे नागरिकांनी आता सतर्कता बाळगणे गरजेचं आहे. नाशिकमधील वाढत्या रुग्ण संख्येकडे दुर्लक्ष केल्यास आणि प्रशासनाच्या नियमांना हरताळ फासल्यास मोठ्या संकटाला नाशिककरांना सामोरे जावं लागण्याची शक्यता (Malegaon Corona Death) आहे.
संबंधित बातम्या :
कोरोनामुळे त्रस्त झालेल्या धारावीला पुरापासून वाचवा, पुनर्विकास समितीचे पालिका आयुक्तांना पत्र
कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा वाढताच, राज्यात एकाच दिवसात 80 पोलीस पॉझिटिव्ह