नववर्षात नाशिककरांना आणखी एक गुड न्यूज, 2023 वर्षे नाशिककरांसाठी ठरतंय बेस्ट
त्यापाठोपाठ आता नाशिकचे विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ घोषित करण्यात आल्याने परदेशातही नाशिकहून उडान करता येणार आहे.
नाशिक : गेल्या काही वर्षांपासून नाशिकला विमानतळ झाले असले तरी विमानसेवा फारशी चांगली नव्हती, अनेक प्रवासी या विमानसेवेला कंटाळले होते. फ्लाइट रद्द होणे, कधी तर सामान नाशिकलाच राहून जाणे अशा विविध बाबी समोर आल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर विमान वाढवणे अशी मागणी केली जात होती. नाशिकमधून दिल्ली आणि हैदराबाद अशा दोन विमानसेवा सुरू आहेत. मात्र नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना खास गिफ्ट केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आले होते. आणखी पाच शहरांत जाण्यासाठी विमानसेवा सुरू केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. 2023 मधील मार्चपासून ही सेवा सुरू होईल असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये आणखी एका गुड न्यूजची भर पडली आहे. नाशिकच्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा जाहीर झाला आहे. त्यामुळे देशांतर्गत विमानसेवा सुरू असलेल्या नाशिक विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ घोषित केल्याने परदेशात सुद्धा नाशिकहून जाता येणार आहे.
दिल्ली आणि हैदराबाद पाठोपाठ बेळगाव, बेंगलोर, गोवा, नागपूर आणि अहमदाबाद शहरांसाठी विमानसेवा मार्चपासून सुरू होणार असल्याची गुड न्यूज देण्यात आली होती.
मार्चपासूनचे संभाव्य वेळापत्रकही नाशिक विमानतळ प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील मोठ्या सात शहरांशी नाशिकची कनेक्टीव्हिटी वाढणार आहे.
त्यामुळे नाशिककरांना हवाई प्रवासाच्या बाबतीत आणखी वाढ करून मिळाली आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिककरांना आनंदाची बातमी मिळाली आहे.
त्यापाठोपाठ आता नाशिकचे विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ घोषित करण्यात आल्याने परदेशातही नाशिकहून उडान करता येणार आहे.
नववर्षात केंद्र सरकारच्या वतिने या दोन्ही गुड न्यूज नाशिककरांना देण्यात आल्या असून या निर्णयाने नाशिककरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.