नाशिकमधील मार्गाला महापालिकेकडून भांतबरेकर यांचे नाव; संगीत क्षेत्रातील मानबिंदूचा अनोखा गौरव!

पंडित दादासाहेब भातंबरेकर हे सुप्रसिद्ध किराणा घराण्याचे गायक सन्माननीय गोपाळराव भातंबरेकर यांचे सुपुत्र, तर गोविंदराव भातंबरेकर यांचे पुतणे होते. या थोर आणि संपन्न घराण्यांचा वारसा दादासाहेब भातंबरेकर यांनी तेवढ्यात ताकदीने पुढे नेला.

नाशिकमधील मार्गाला महापालिकेकडून भांतबरेकर यांचे नाव; संगीत क्षेत्रातील मानबिंदूचा अनोखा गौरव!
नाशिकमध्ये सहजीवन कॉलनीतील मार्गाला दादासाहेब भातंबरेकर यांचे नाव देण्यात आले.
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 2:43 PM

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) वीसे मळा, कॉलेज रोड येथील सहजीवन कॉलनीतील मार्गाला महापालिकेच्या (Municipal Corporation) वतीने दादासाहेब भातंबरेकर यांचे नाव देण्यात आले. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. संगीत भूषण पंडित दादासाहेब भातंबरेकर म्हणजे संगीत क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तीमत्व असून, त्यांचे संगीत क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. या कार्यक्रमाला महापौर सतीश कुलकर्णी, आमदार प्रा. देवयानी फरांदे, डॉ. एम. एस. गोसावी, माजी आमदार हेमंत टकले, जयंतराव जाधव, नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले, शैलेश कुटे, नगसेवक जॉय कांबळे, शाहू खैरे, शिवाजी गांगुर्डे, जेष्ठ संगीतकार डॉ.अविराज तायडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनेक कलाकार घडवले

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, पंडित दादासाहेब भातंबरेकर हे सुप्रसिद्ध किराणा घराण्याचे गायक सन्माननीय गोपाळराव भातंबरेकर यांचे सुपुत्र, तर गोविंदराव भातंबरेकर यांचे पुतणे होते. या थोर आणि संपन्न घराण्यांचा वारसा दादासाहेब भातंबरेकर यांनी तेवढ्यात ताकदीने पुढे नेला. पंडित बालगंधर्व, पंडित भीमसेन जोशी, सुप्रसिद्ध गायिका श्रीमती माणिक वर्मा यांसारख्या अनेक कलाकारांना त्यांनी हार्मोनियमवर साथसंगत केली. नाशिकच्या लोकहितवादी मंडळातर्फे होणाऱ्या गायन स्पर्धाच्या माध्यमातून अनेक कलाकार घडवले. 25 वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी या संगीत स्पर्धांमध्ये आपल्या वादनानी आणि कौशल्यानी रंगत आणली.

स्वयंचलित तानपुरा साकारला

काळाच्या बदलत्या स्वरूपानुसार संगीत वाद्यात त्यांनी तांत्रिक प्रगतीचा वापर करून वीजेवर आणि सहा व्होल्टच्या बॅटरीवर चालणारा, स्वयंचलित तानपुरा बनवला आणि संगीत क्षेत्रातील मान्यवरांची वाहवा मिळवली. स्वभावाने अत्यंत मृदुभाषी-मितभाषी असे दादासाहेब भातंबरेकर म्हणजे संगीत क्षेत्रातील एक मानबिंदूच आहेत, अशी पं. दादासाहेब भातंबरेकर यांची ओळख पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थितांनe करून दिली. यावेळी माजी आमदार हेमंत टकले, डॉ. एम. एस गोसावी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमातील उपस्थितांचे आभार प्रा. जयंत भातंबरेकर यांनी मानले.

इतर बातम्याः

चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!

कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.