एका शिक्षकानं नाशकातलं गाव गुलाबी केलं, राज्यपालांनाही पहाण्याचा मोह आवरला नाही, पाहा स्पेशल रिपोर्ट
नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील हे गाव. आता भिंतघर ऐवजी गुलाबी गाव म्हणून नावारुपास आलंय.
नाशिक : जयपूरची पिंकसिटी ही ओळख सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातही (Nashik Bhintghar Pink Village) असं एक गाव आहे की त्या गावाला भेट देण्याचा मोह खुद्द राज्यपालांना देखील आवरलेला नाही. चला तर मग पाहुयात हे गाव नेमकं आहे तरी कसं (Nashik Bhintghar Pink Village).
भिंतघर… हे नाव ऐकलं की तुम्हाला वेगळाच भास होईल. मात्र, या गावाने असं काही करुन दाखवलं आहे, की खुद्द राज्यपालांनी या गावाला भेट दिलीये. गावात राज्यपाल येताच त्यांचं इथल्या महिला भगिनींनी औक्षण आणि आदिवासी पारंपारीक नृत्य करत स्वागत केलं. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील हे गाव. आता भिंतघर ऐवजी गुलाबी गाव म्हणून नावारुपास आलंय. गावातील प्राथमिक शिक्षक जितेंद्र गवळी सर यांच्या संकल्पनेतून गावाचा कायापाट झालाय.
गावात प्रवेश करताच सर्व घरही गुलाबी रंगांची दिसतात. महिला सबलीकरनाच प्रतीक म्हणून घरांना गुलाबी रंग देण्यात आलाय. प्रत्येक घर हे आकर्षक आणि टुमदार दिसतं. घरासमोर लावलेली झाड ही आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरतात. विशेष म्हणजे इथल्या प्रत्येक घरावर सुविचार बघायला मिळतात. घरातील कर्त्या पुरुषासोबत साथ देणाऱ्या महिला भगिनींचं नाव हे प्रत्येक घरावर दिसतात. गावातील स्वच्छता तर अगदी डोळ्यात भरणारी आहे. भव्य दिव्य गोशाळा ही इथे येणाऱ्या पर्यटकांचं आकर्षण ठरत आहे. गावातील प्रत्येक चौकात तुम्हाला सडा-रांगोळी काढलेली दिसेल. बरं हे एक दिवस नाही ह.. दररोज अगदी नित्यनेमाने इथले रहिवाशी करत असतात.
हे गाव पूर्णतः डिजीटलच्या दिशेने प्रवास करतंय. इथली अंगणवाडी प्राथमिक शाळाही डिजीटल आहे. गावात मोठं आदिवासी सांस्कृतिक भवन ही उभं राहिलय ज्याचं नुकतंच राज्यपालांचे हस्ते लोकार्पण करण्यात आलंय (Nashik Bhintghar Pink Village).
आता गावाचा विकास झाला. गाव आदर्श झालं, मात्र गावातील तरुणांना रोजगार मिळणं गरजेचं आहे. असं इथले गावकरी सांगतात. कारण, चार महिने असणारा पावसाळा संपला की इथल्या नागरिकांना बाहेर जाऊन मोलमजुरी करावी लागते. जर इथेच रोजगार निर्माण झाला, तर अजून विकासाला चालना मिळेल आणि आता राज्यपालानी गावाला भेट दिलीये त्यामुळे गावकऱ्यांच्या ही अपेक्षा वाढल्या आहेत.
त्यामुळे जर आपल्या गावाचा विकास करायचा असेल, गावात सोयी सुविधा कशा असाव्यात हे जर बघायचं असेल तर प्रत्यकानेच या गुलाबी गावाला भेट देण्याची गरज आहे.
Special Story | महाराष्ट्रातलं ‘कैलास’, सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं ‘भीमाशंकर’ https://t.co/VPrMBtpX18 #Bhimashankar | #Sahyadri | #travel | #Tourism |
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 30, 2021
Nashik Bhintghar Pink Village
संबंधित बातम्या :
IRCTC Tour Package | अवघ्या 5 हजार रुपयांत करा वडोदरातल्या ‘या’ सुंदर ठिकाणांची सफर…
Travel | अवघ्या 899 रुपयांत विमान प्रवास करण्याची संधी, ‘ही’ कंपनी देतेय खास ऑफर!