Budhha Paurnima : 5 फूट उंचीच्या 100 बुद्धमूर्ती, 100 रथात मिरवणूक, 100 गावांना बुद्ध मूर्तीदान

नाशिक जिल्ह्यात बौद्ध पोर्णिमेनिमित्त शंभर गावांना शंभर बुद्ध मूर्तींचे प्रदान करण्याचा अनोखा सोहळा रंगाला. या सोहळ्यात शंभर रथांमधून शंभर बुद्ध मूर्तींची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

Budhha Paurnima : 5 फूट उंचीच्या 100 बुद्धमूर्ती, 100 रथात मिरवणूक, 100 गावांना बुद्ध मूर्तीदान
buddha purnima 2023Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 4:17 PM

नाशिक : जगाला शांती आणि अहिंसेचा मार्ग दाखविणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या ( Nashik Budhha Paurnima ) जयंती निमित्त नाशिकमध्ये डोळ्यांचे पारणे फिटेल असा अद्भूत सोहळा साजरा झाला. भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बीएमए ग्रुप यांच्यावतीने नाशिक ( Nashik )  जिल्ह्यातील तब्बल शंभर गावांना भगवान गौतम बुद्धांच्या पाच फूटांच्या मूर्तींचे दान करण्यात आले. शंभर रथांमधून या या शंभर बुद्ध मूर्तींची मिरवणूक निघाली आणि संपूर्ण वातावरणच पवित्र आणि मंगलमय झाले. हा सोहळा आणि मिरवणूक संपूर्ण नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण  सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nashik buddha purnima

Nashik buddha purnima 2023

पाचशे श्रामणेरांना दीक्षा

वैशाख पोर्णिमा म्हणजेच बुद्ध पोर्णिमेला तथागत गौतम बुद्ध यांची जयंती जगभरात आनंद आणि उत्साहात साजरी केली जात असते. नाशिक महानगरीत यंदा आणखीनच उत्साहाला उधाण आले होते. नाशिक शहरातून हजारो नागरिकांनी बुद्ध मूर्तींची मिरवणूक काढली. यावेळी जिल्हाच्या विविध तालुक्यातील शंभर गावातील 500 श्रामणेर आणि हजारो बौद्ध बांधवांसह नागरिक सहभागी झाले होते. सम्राट अशोक जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि बुद्ध पोर्णिमेनिमित्त 23 एप्रिल ते 2 मे दरम्यान जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये श्रामणेर शिबिर घेण्यात आले. या शिबिरात शंभर गावातील प्रत्येक पाच उपासकांना श्रामणेर शिबिरात दीक्षा देण्यात आली.

Nashik buddha purnima

Nashik buddha purnima

शंभर रथातून निघालेली नयनरम्य मिरवणूक

नाशिक शंभर जिल्हयांना शंभर गौतम बुद्धांच्या पाच फूटांच्या मूर्तींचे अनोखे दान करण्यासाठी शंभर रथांमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मूर्ती फायबरपासून एकाच साच्यात तयार करण्यात आल्या होत्या. फुलांची आरास आणि निळे झेंडे लावून शंभर रथातून निघालेली ही मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. तसेच अनेक किलोमीटर ही मिरवणूक चालली. शहरातील जुना आडगाव नाका, द्वारका, मुंबई नाका, गडकरी चौक, त्र्यंबक नाका, सीबीएस मार्गे गोल क्लब येथे शोभायात्रा निघाली. यानंतर महाबौद्ध धम्म परिषदेत भदन्त ज्ञानज्योती महाथेरो, भदन्त बोधीपाल, भदन्त धम्मरत्न, भदन्त सुगत, भदन्त आर्यनाग यांनी मार्गदर्शन केले. या सोहळ्यात सीमा पाटील आणि जॉली मोरे यांच्या बौद्ध भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.

Non Stop LIVE Update
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्.
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?.
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.