‘महाविकास आघाडी सरकारला 5 नव्हे तर 25 वर्षे भीती नाही’, छगन भुजबळांचा दावा, भाजपवर टीकास्त्र

महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याची टीका भाजप नेते सातत्यानं करत असतात. पण महाविकास आघाडी एकसंध राहील असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

'महाविकास आघाडी सरकारला 5 नव्हे तर 25 वर्षे भीती नाही', छगन भुजबळांचा दावा, भाजपवर टीकास्त्र
Follow us
| Updated on: Dec 06, 2020 | 2:48 PM

नाशिक: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यावरुन अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपचे नंबर एकचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप सोडली. जयसिंगराव गायकवाड यांनीही भाजपला रामराम ठोकला. पदवीधरमध्ये पुणे, नागपूरमध्येही महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आहे. त्यामुळे आता राजकारणाची हवा बदलली आहे, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिलीय. (Chagan Bhujbal on mahavikas aghadi government)

महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याची टीका भाजप नेते सातत्यानं करत असतात. पण महाविकास आघाडी एकसंध राहील असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. आता भीती महाविकास आघाडी नाही तर भाजपच्या लोकांना आहे. भाजपमधील लोकप्रतिनिधींनी खडसे आणि जयसिंगरावांच्या पावलावर पाऊल टाकायचं ठरवलं तर अवघड होईल, असा टोलाही भुजबळांनी लगावला आहे. शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकारला आता 5 नाही तर 25 वर्षे भीती नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

ओबीसींमध्ये दोन गट नाहीत- भुजबळ

ओबीसी समाजात दोन गट पडल्याची चर्चा सुरु आहे. त्यावर ओबीसी समाजात दोन गट नाहीत, असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील मोर्चात काही लोकांनी शरद पवार यांच्या फोटोवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर ऑब्जेक्शन घेण्याचं कारण काय? महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण देण्याचा निर्णय शरद पवार यांनीच घेतला आहे. ओबीसींची वेगळी जनगणना व्हावी, यातही त्याचाच पुढाकार आहे. पवार हे सत्यशोधक समाजाच्या कुटुंबातून मोठे झाले आहेत. त्यामुळे सर्वांना मदत करण्याचीच त्यांची भूमिका असल्याचंही भुजबळ म्हणाले.

‘शेतकरी आंदोलनावर केंद्रानं भूमिका घ्यावी’

गेल्या 10 दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकारनं भूमिका घ्यायला हवी. शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारनं सकारात्मकतेनं घेणं गरजेचं असल्याचं मत भुजबळांनी व्यक्त केलं आहे. शेतकरी आपल्या राज्यात परत गेले तर मोठी जखम देऊन जातील, असा इशाराही भुजबळांनी दिला आहे.

शेतकरी आंदोलन प्रश्नावर पवार राष्ट्रपतींना भेटणार

माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायद्यांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. शरद पवार हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय. यावेळी पवार यांच्यासोबत अन्य राजकीय पक्षांचे काही नेते उपस्थित असणार आहेत. शरद पवार हे सीताराम येचुरी आणि डी. राजा यांच्यासह राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेणार आहेत. या भेटीत शेतकरी आंदोलनाविषयी चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या:

BREAKING | शरद पवारांनी शड्डू ठोकला, थेट राष्ट्रपतींना भेटणार

भाजपने पराभवातून धडा घ्यावा; ईडी, सीबीआयच्या दमदाटीचे राजकारण आता चालणार नाही: भुजबळ

Chagan Bhujbal on mahavikas aghadi government

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.