बोगस वैद्यकीय प्रमाणपत्राबाबत “त्या” डॉक्टरला अंतरिम जामीन, पण तरीही होऊ शकते अटक
नाशिकच्या ग्रामीण पोलीस दलाच्या नाशिक तालुका पोलीस ठाण्यात बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी 29 जणांवर गुन्हा दाखल आहे.
नाशिक : बहुचर्चित बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी फरार असलेल्या तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास्तव यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मात्र असे असले तरी ग्रामीण पोलिसांना 14 नोव्हेंबर पर्यन्त तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीनिवास यांना अटक करता येणार आहे तर दुसरींकडे डॉ. निखिल सैंदाणे यांच्या जामीन अर्जावर 14 नोव्हेंबरलाच सुनावणी होणार आहे. तत्कालीन पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी याबाबत पुढाकार घेतला होता. यामध्ये ग्रामीण पोलिसांकडून 29 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात असलेले तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे आणि डॉ. किशोर श्रीनिवास यांच्याही नावाचा समावेश असल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली होती. पोलीस कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदलीसाठी लागणारे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याचं रॅकेट नाशिकच्या ग्रामीण पोलीसांनी उद्ध्वस्त केले होते.
नाशिकच्या ग्रामीण पोलीस दलाच्या नाशिक तालुका पोलीस ठाण्यात बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी 29 जणांवर गुन्हा दाखल आहे.
या प्रकरणी आत्तापर्यंत चौघांना अटक करण्यात आली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांची पोलीस कोठडी संपली असून न्यायालयात त्यांची रवानगी झाली आहे.
यामध्ये जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे आणि डॉ. किशोर श्रीनिवास हे या प्रकरणात फरार आहे.
डॉ. निखिल सैंदाणे आणि डॉ. किशोर श्रीनिवास या दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात याबाबत धाव घेतली असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
त्यापैकी डॉ. निखिल सैंदाणे यांच्या जामीन अर्जावर 14 नोव्हेंबरला सुनावणी होणार असून डॉ. किशोर श्रीनिवास त्यांना अंतरिम जामीन देण्यात आला असून त्यानाना ग्रामीण पोलीस कधीही अटक करू शकतात.