नाशिकमध्ये कोरोना सानुग्रह अनुदानासाठी आले 14 हजार अर्ज; बळींची संख्या 9 हजारांच्या घरात!

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड-19 या आजाराने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. त्याअनुषंगाने अर्ज मागवण्यात आले आहेत. हे अनुदान मिळवण्यासाठी वारसांना तहसीलदारांची स्वाक्षरी असलेले संमतीपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.

नाशिकमध्ये कोरोना सानुग्रह अनुदानासाठी आले 14 हजार अर्ज; बळींची संख्या 9 हजारांच्या घरात!
प्रातिनिधिक छायाचित्र.
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 4:56 PM

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) कोरोनाच्या (Corona) सानुग्रह अनुदानासाठी आयसीएमआरच्या पोर्टलवर तब्बल 14 हजार अर्ज आल्याचे समोर आले आहे. मात्र, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे फक्त 8 हजार 892 लोकांचा बळी गेलाय. एकीकडे कोरोना बळींची संख्या दडवली का, अशी कुजबुज सुरूय. तर दुसरीकडे प्रशासन मात्र अनेक रुग्णांचा (Patient) घरी मृत्यू झाला. कोणी रुग्णालयात नेताना तर कोणी जिल्ह्याबाहेर दगावल्याचे म्हणत आहे. काहीही असो. कोरोनाची तिसरी लाट येण्याआधीच कमी झाली. मात्र, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील मृत्यूच्या आकड्यांची संख्या आणि त्यातला गोंधळाची चर्चा काही केल्या कमी होताना दिसत नाही.

कसे मिळते अनुदान?

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड-19 या आजाराने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. त्याअनुषंगाने अर्ज मागवण्यात आले आहेत. एखाद्या कुटुंबातील एक व्यक्ती कोरोनाने मृत झाला असेल, तर त्याच्या नावावरचे सानुग्रह अनुदान मिळावे म्हणून एकपेक्षा जास्तही अर्ज येऊ शकतात. हे लक्षात घेता अनुदान मिळवण्यासाठी आता वारसांना तहसीलदारांची स्वाक्षरी असलेले संमतीपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.

कोठे मिळते माहिती?

महसूल व वन आपत्तीव्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने प्रसारीत केलेल्या शासन निर्णयान्वये कोविड-19 आजारामुळे मृतांच्या निकटच्या नातेवाईकास सानुग्रह स्वरूपात मदत करण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे अर्ज सादर करण्यासाठी mahacovid19relief.in व https://epassmsdma.mahait.org/login.htm ही संकेतस्थळे उपलब्ध आहेत. त्यावर सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. काही अडचण वाटल्यास जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी जिल्हा शल्य चिकित्सक मदत कक्ष 9607263456, नाशिक महानगरपालिका क्षेत्रासाठी 0253-2317292, 9607643366 व मालेगाव महानगरपालिका क्षेत्राकरिता 8956443070, 8956443068 हे मदत कक्ष व संपर्क क्रमांक निश्चित करण्यात आले आहेत.

यांना कागदपत्रांची गरज नाही…

केंद्र शासनाकडे ज्यांचा कोविड-19 या आजाराने मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे, अशा व्यक्तींच्या नातेवाईकांचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येणार आहे. इतर प्रकरणी कोविड-19 मुळे मृत्युचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणे देखील माहितीची शहानिशा करून मंजूर करण्यात येणार आहेत. अर्जदाराकडे मृत्युचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याची कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत सादर करावे लागणार आहेत.

ही कागदपत्रे सादर करणे बंधनकारक…

– अर्जदाराचा स्वत:चा तपशील, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक

– अर्जदाराचा स्वत:चा बँक तपशील

– मृत पावलेल्या व्यक्तीचा आधार तपशील किंवा आधार नोंदणी क्रमांक

– मृत व्यक्तीचे वैद्कीय प्रमाणपत्र (Medical Certificate of cause of Death)

– मृताचा RT-PCR/Molecular Tests/RAT Positive अहवाल

– मृताच्या रुग्णालयात दाखल असताना करण्यात आलेल्या आरोग्‍य चाचण्यांचा अहवाल

– अर्जदाराच्या मते हा मृत्यू कोविड-19 मुळे झाल्याचे सिद्ध करत असेल, अशी इतर कोणतीही कागदपत्रे

– मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 खालील मृत्यू प्रमाणपत्र

– इतर निकट नातेवाईकांचे नाहरकत असल्याचा स्वयं घोषणापत्र

इतर बातम्याः

चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!

कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.