नाशिकमध्ये आणखी एक कोरोना बळी; किती आहेत रुग्ण, काय आहे आजचा रिपोर्ट?
नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात कोरोनाच्या 33 रुग्णांचा मृत्यू झाला. 6 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान हे बळी गेले. यातले 18 मृत्यू हे नाशिक महापालिका क्षेत्रात तर 16 मृत्यू हे नाशिकच्या ग्रामीण भागात झाले. त्यामुळे नाशिकमधील कोरोनाचे मृत्यू तांडव थांबणार कधी, असा सवाल आता निर्माण होत आहे.
नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) आणखी एका कोरोना (Corona) रुग्णाचा (Patient) मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात कोरोनाच्या 33 रुग्णांचा मृत्यू झाला. 6 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान हे बळी गेले. यातले 18 मृत्यू हे नाशिक महापालिका क्षेत्रात तर 16 मृत्यू हे नाशिकच्या ग्रामीण भागात झाले. त्यानंतरही सोमवारी, 14 फेब्रुवारी रोजी सुद्धा 4, मंगळवारी 15 फेब्रुवारी रोजी 4 जणांचा मृत्यू झाला. बुधवारी, 16 फेब्रुवारी एक, 17 फेब्रुवारी रोजी गुरुवारी एकाचा आणि 18 फेब्रुवारी रोजी शुक्रवारी पुन्हा एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नाशिकमधील कोरोनाचे मृत्यू तांडव थांबणार कधी, असा सवाल आता निर्माण होत आहे. त्यातही सध्या लहान मुलांचे लसीकरण ठप्प आहे. दुसरीकडे जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 65 हजार 337 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 988 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 132 ने घट झाली आहे. आत्तापर्यंत 8 हजार 885 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
सध्या कुठे रुग्ण?
सध्या कोरोनाचे नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 62, बागलाण 54, चांदवड 44, देवळा 23, दिंडोरी 50, इगतपुरी 16, कळवण 67, मालेगाव 19, नांदगाव 31, निफाड 123, पेठ 19, सिन्नर 94, सुरगाणा 51, त्र्यंबकेश्वर 49, येवला 69 असे एकूण 771 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 167, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 11 तर जिल्ह्याबाहेरील 39 रुग्ण असून, असे एकूण 988 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 75 हजार 210 रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये नाशिक 6, बागलाण 6, चांदवड 6, देवळा 1, दिंडोरी 13, इगतपुरी, कळवण 11, मालेगाव 4, निफाड 13, पेठ 3, सिन्नर 8, सुरगाणा 6, त्र्यंबकेश्वर 10, येवला 3 असे एकूण 90 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
नाशिक जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 97.13 टक्के, नाशिक शहरात 98.43 टक्के, मालेगावमध्ये 97.30 टक्के, तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 98.01 टक्के आहे. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.12 टक्के इतके आहे. कोरोनामुळे नाशिकच्या ग्रामीण भागात आतापर्यंत 4 हजार 297 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 98, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 364 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 885 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
18 फेब्रुवारी रोजी कळवलेले मृत्यू
नाशिक मनपा – 00
मालेगाव मनपा – 00
नाशिक ग्रामीण – 01
जिल्हा बाह्य – 00
इतर बातम्याः
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!