Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Corona | नाशिकमध्ये किशोरवयीन मुलांची लसीकरणाकडे पाठ, 3 आठवड्यात फक्त अर्धेच टार्गेट पूर्ण!

केंद्र सरकारने 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण सुरू केले. मात्र, त्याकडे मुलांनी अक्षरशः पाठ फिरवली असून, नाशिकमध्ये आतापर्यंत निम्मेही टार्गेट पूर्ण झाले नसल्याचे समोर आले आहे. त्याबद्दल चिंता व्यक्त केली जातेय.

Nashik Corona | नाशिकमध्ये किशोरवयीन मुलांची लसीकरणाकडे पाठ, 3 आठवड्यात फक्त अर्धेच टार्गेट पूर्ण!
Corona Vaccination
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 7:05 AM

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) दिवसेंदिवस कोरोनाचे (Corona) रुग्ण वाढत आहेत. विशेष म्हणजे ते घरच्या घरी उपचार घेऊन ठणठणीत बरेही होत आहे. मात्र, आता ओमिक्रॉननंतर (Omicron) कोरोनाचा पुन्हा एखादा नवा विषाणू आला, तर हाहाकार माजू शकतो. हेच ध्यानात घेत केंद्र सरकारने 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण सुरू केले. मात्र, त्याकडे मुलांनी अक्षरशः पाठ फिरवली असून, नाशिकमध्ये आतापर्यंत निम्मेही टार्गेट पूर्ण झाले नसल्याचे समोर आले आहे. त्याबद्दल चिंता व्यक्त केली जातेय.

फक्त इतकेच लसीकरण

देशभरात 3 जानेवारी 2022 पासून किशोरवयीन मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले. त्यात नाशिकमध्येही सुरुवातीला लसीकरणाला उदंड प्रतिसाद मिळाला. अवघ्या 11 दिवसांत शहरामध्ये 36 हजार मुलांचे लसीकरण झाले. मात्र, गेल्या काही आठवड्यापासून लसीकरणाकडे मुलांनी पाठ फिरवली आहे. महिनाभरात एक लाख मुलांच्या लसीकरणाचे टार्गेट आहे. मात्र, आतापर्यंत फक्त 48 हजार 223 मुलांचे लसीकरणच पूर्ण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने आता शाळा आणि महाविद्यालयात जात लसीकरणाला गती देण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान दुसरीकडे 10 जानेवारीपासून शहरात बूस्टर डोस देण्यात येत आहेत. त्यात एकूण 25 हजार फ्रंटलाईन वर्कर्सपैकी फक्त 13 हजार 125 जणांनी बूस्टर डोस घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे फ्रंटलाईन वर्कर्सनीही लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे दिसते आहे.

रुग्णांची संख्या 18 हजार पार

नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. मात्र, यातील बहुतांश रुग्ण ओमिक्रॉनचे असल्यामुळे ते लवकरात लवकर उपचार घेऊन घरच्या घरी बरे होत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 27 हजार 830 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 18 हजार 17 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 785 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

येथे आहेत रुग्ण

नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 1 हजार 98, बागलाण 301, चांदवड 347, देवळा 457, दिंडोरी 521, इगतपुरी 344, कळवण 139, मालेगाव 182, नांदगाव 328, निफाड 799, पेठ 123, सिन्नर 822, सुरगाणा 45, त्र्यंबकेश्वर 259, येवला 342 असे एकूण 6 हजार 108 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 11 हजार 324, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 307 तर जिल्ह्याबाहेरील 278 रुग्ण असून असे एकूण 18 हजार 17 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 54 हजार 632 रुग्ण आढळून आले आहेत.

इतर बातम्याः

Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!

Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना

National Children’s Award | 14 किलोमीटर खाडी 4 तास 9 मिनिटांत पोहून पार; ‘स्वयंम’च्या यशाने पंतप्रधानही भारावले…!

'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य.
VIDEO: सातरच्या आजीचा नादखुळा.. 65व्या वर्षी फिरवतेय सुपरफास्ट रिक्षा
VIDEO: सातरच्या आजीचा नादखुळा.. 65व्या वर्षी फिरवतेय सुपरफास्ट रिक्षा.
तुमची मुलगी द्या.., गावगुंडाकडून शिक्षकाला मारहाण, व्हिडीओ बघून हादराल
तुमची मुलगी द्या.., गावगुंडाकडून शिक्षकाला मारहाण, व्हिडीओ बघून हादराल.
'..बहुमत मिळालं म्हणून कोणी माज करू नये', शिंदेंच्या आमदाराचा टोला
'..बहुमत मिळालं म्हणून कोणी माज करू नये', शिंदेंच्या आमदाराचा टोला.
ठाकरे बंधूंची युती अन पवार कुटुंबाचं मनोमिलन? शरद पवार स्पष्टच म्हणाले
ठाकरे बंधूंची युती अन पवार कुटुंबाचं मनोमिलन? शरद पवार स्पष्टच म्हणाले.
सूर्यदेव कोपले! चंद्रपूर ठरला देशातला सर्वात हॉट जिल्हा
सूर्यदेव कोपले! चंद्रपूर ठरला देशातला सर्वात हॉट जिल्हा.
वकील अंजानच्या विरोधात ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी रवाना
वकील अंजानच्या विरोधात ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी रवाना.
लँड स्कॅमचा बादशाह म्हणत शेलारांचा ठाकरेंवर गंभीर आरोप, ऑडिओ व्हायरल
लँड स्कॅमचा बादशाह म्हणत शेलारांचा ठाकरेंवर गंभीर आरोप, ऑडिओ व्हायरल.
'..शेवटी रक्ताचं नातं आहे', युगेंद्र पवारांनी स्पष्टच सांगितलं
'..शेवटी रक्ताचं नातं आहे', युगेंद्र पवारांनी स्पष्टच सांगितलं.
खरं सांगायच तर.., थोपटेंचा भाजपात प्रवेश, सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण
खरं सांगायच तर.., थोपटेंचा भाजपात प्रवेश, सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण.