Nashik Corona : कोरोनाचा गुणाकार थांबेना; काय आहे नाशिक जिल्ह्याचा आजचा रिपोर्ट, घ्या जाणून…!
नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अहवालानुसार सध्या जिल्ह्यातील 4 लाख 19 हजार 692 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून, आत्तापर्यंत 8 हजार 777 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नाशिकः नाशिक जिल्ह्यात कोरोना (Corona) रुग्णांचा सुरू असलेला गुणाकार काही केल्या कमी व्हायला तयार नाही. महापालिका क्षेत्रासह निफाड, सिन्नर, दिंडोरी, इगतपुरीत सुरू असलेली रुग्णवाढ वाढतच आहे. सद्यस्थितीत 15 हजार 965 रुग्णांवर उपचार सुरू अशी माहिती, असा प्रात झालेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अहवालात देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यातील 4 लाख 19 हजार 692 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून, आत्तापर्यंत 8 हजार 777 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
येथे वाढतायत रुग्ण
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्णामध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 770, बागलाण 166, चांदवड 205, देवळा 190, दिंडोरी 367, इगतपुरी 331, कळवण 129, मालेगाव 200, नांदगाव 212, निफाड 880, पेठ 51, सिन्नर 503, सुरगाणा 36, त्र्यंबकेश्वर 159, येवला 217 असे एकूण 4 हजार 416 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 10 हजार 874, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 342 तर जिल्ह्याबाहेरील 333 रुग्ण असून, असे एकूण 15 हजार 965 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 44 हजार 434 रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये नाशिक 165, बागलाण 47, चांदवड 52, देवळा 90, दिंडोरी 73, इगतपुरी 34, कळवण 64, मालेगाव 54, नांदगाव 13, निफाड 103, पेठ 03, सिन्नर 119, सुरगाणा 4, त्र्यंबकेश्वर 22, येवला 50 असे एकूण 893 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 94.43
जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 94.77 टक्के, नाशिक शहरात 94/13 टक्के, मालेगावमध्ये 94.76 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 93.76 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 94.43 टक्के इतके आहे. जिल्ह्यातील मृत्यू पाहता आजवर नाशिक ग्रामीणमध्ये 4 हजार 255 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 38, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 358 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 777 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील आजचे चित्र
– 4 लाख 44 हजार 432 एकूण कोरोनाबाधित.
– 4 लाख 19 हजार 692 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले 15 हजार 965 पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 94.43 टक्के.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अहवालात देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यातील 4 लाख 19 हजार 692 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून, आत्तापर्यंत 8 हजार 777 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
-डॉ. अनंतर पवार, जिल्हा नोडल अधिकारी
इतर बातम्याः
Nashik Election: जानेवारीअखेरीस प्रारूप प्रभाग रचनेला लागणार मुहूर्त; कुठे रखडली प्रक्रिया?