Video: नाशिकमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची परवड, व्हेंटिलेटर बेडसाठी हेळसांड सुरु

नाशिकमध्ये व्हेंटिलेटर बेड मिळत नसल्याने रुग्णांना हॉस्पिटलच्या दारोदार फिरावं लागत आहे.

Video: नाशिकमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची परवड, व्हेंटिलेटर बेडसाठी हेळसांड सुरु
व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्णांची हेळसांड सुरु
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 1:49 PM

नाशिक: महाराष्ट्रावर आलेलं कोरोनाचं संकट आता आणखी गंभीर रुप धारण करत आहे. नाशिक शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड सुरु आहे. रुग्ण व्हेंटिलेटर बेड मिळत नसल्याने हॉस्पिटलच्या दारोदार फिरत आहेत. रुग्णाच्या नातेवाईकांकडून व्हिडीओच्या माध्यमातून मदतीची मागणी करण्यात येत आहे. (Nashik Corona situation serious patients not get ventilator bed in hospital)

नाशिकमध्ये रुग्ण रामभरोसे ..

नाशिक हे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांपैकी एक आहे. नाशिकमध्ये सध्या 19 हजार 735 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. दररोज यामध्ये रुग्णांची वाढ होत आहे. नाशिकमध्ये कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणारे व्हेंटिलेटर्स,ऑक्सिजन बेड, रेमडेसिव्हीरची परिस्थिती गंभीर झालीय. नाशिक देशातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण असणाऱ्या 10 जिल्ह्यांमध्ये आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर व्हेटिलेटर्स बेड मिळावा म्हणून रुग्णांनी व्हिडीओ शेअर करुन मदत मागितली आहे. यापार्श्वभूमीवर नाशिकमधील रुग्ण राम भरोसे असल्याचं समोर आलं आहे.

नाशिकमध्ये ऑक्सिजन तुटवडा

नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ऑक्सिजन तुटवड्याचं दाहक वास्तव समोर आलं आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेनं अधिग्रहित केलेल्या सुविचार हॉस्पिटलमधील ऑक्सिजन साठा संपला आणि अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली. याच रुग्णालयात व्हेंटिलेटरवर आणि ऑक्सिजनवर असलेल्या 30 रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना हलवण्याची धावपळ सुरू झाली. अखेर रुग्णांच्या नातेवाईकांनी मोठी धावपळ करून व्हेंटिलेटर वर असलेल्या 6 रुग्णांना इतरत्र हलवले.

नाशिक शहरामध्ये गुरवारी कोरोना रुग्ण संख्येने आत्तापर्यंतचे सर्व आकडे मागे टाकले असताना शहरांमध्ये बेड, रेमडिसिव्हर आणि लस यांचा तुटवडा तर आहेच. मात्र आता ऑक्‍सिजनचा देखील तुटवडा वाढल्याने नागरिकांनी जबाबदारी ओळखत प्रशासनाचं काम हलकं करावं अशी मागणी होते आहे.

नाशिकमध्ये सध्या कोरोनाची परिस्थिती काय?

एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्ण – 19735 काल दिवसभरात एकूण मृत्यू – 11 नाशिकमध्ये दररोज साधारण 3500 ते 4000 चाचण्या मृत्यू दर – 3 ते 3.5 टक्के दर रोज लसीकरण – 5500- 6000 नाशिक मध्ये पॉझिटिव्हिटी रेट – साधारण 35% लसीचा साठा – चार दिवस पुरेल इतका लसीचा एकूण साठा – 189360 कोव्हीशिल्ड – 163100 कोव्हॅक्सीन – 26260 ऑक्सिजन साठा – अपुरा

संबंधित बातम्या:

नाशकात खासगी हॉ्स्पिटलमधला ऑक्सिजन साठा संपला अन् 30 रुग्णांचा श्वास कोंडला, वाचा नेमकं काय घडलं?

Nashik Corona : नाशिक पालिकेचं कोरोनासाठी पोर्टल; बेड , रेमडेसिव्हीर कुठे आणि कसं मिळणार, हेल्पलाईन नंबरही जारी

(Nashik Corona situation serious patients not get ventilator bed in hospital)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.