Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | दुष्काळी येवल्याची सिंचन क्षमता वाढणार; 21 योजनांचा मार्ग मोकळा, किती निधी मंजूर?

येवला तालुक्यातील देवानासह 21 योजनांवरील स्थगिती उठविण्यात आली आहे. त्यामुळे या दुष्काळी तालुक्यातील सिंचन क्षमता अधिक वाढणार आहे.

Nashik | दुष्काळी येवल्याची सिंचन क्षमता वाढणार; 21 योजनांचा मार्ग मोकळा, किती निधी मंजूर?
येवला तालुक्यातील योजनांना मंजुरी मिळाल्यामुळे सिंचन वाढणार आहे.
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 7:05 AM

नाशिकः एक आनंदाची बातमी. नाशिक जिल्ह्यातल्या (Nashik) येवला तालुक्यातील देवनासह 21 योजनांना प्रशासकीय मान्यता मिळूनही कोरोनाच्या निर्बंधांमुळे 23 मे 2021 रोजी महामंडळाकडून राज्यातील सर्व योजनांच्या निविदा प्रक्रियेस स्थगिती देण्यात आलेली होती. अखेर ही स्थगिती महामंडळाने उठविली असून, येवला तालुक्यातील देवना साठवण तलावासह 21 योजनांचा मार्ग मोकळा झाला आहे. या सर्व योजनांसाठी शासनाकडून 28 कोटी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर असून, त्याची निविदा प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे. या योजना राबविण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

देवनाचा कसा होईल फायदा?

देवना साठवण तलाव ही येवला तालुक्यात खरवंडी व देवदरी गावाच्या जवळ दोन मोठ्या नाल्यांच्या संगमावर माणिकपुंज मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आहे. येवला तालुक्यातील देवदरी, खरवंडी, राहडी, कोळम खु. या गावाच्या शिवारातील शेतीस उपसा पद्धतीने सिंचनाचा लाभ होणार आहे. तसेच, वन्य प्राण्यांच्या पिण्यासाठी व रोपवाटीकेसही लाभ होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून 2.08 दलघमी (73.44 दलघफू) पाणी वापरासाठी पाणी उपलब्धता उपलब्ध होणार आहे.

किती भू-संपादन?

देवना साठवण तलाव योजनेसाठी संयुक्त मोजणीनुसार वैजापूर तालुक्यातील 13.00 हेक्टर व येवला तालुक्यातील 44.00 हेक्टर अशी एकूण 57.०० हेक्टर क्षेत्र संपादित होत आहे. त्यापैकी 55.75 हेक्टर वनक्षेत्र असून 1.25 हेक्टर क्षेत्र हे खासगी आहे. या योजनेची एकूण किंमत 15 कोटी 65 लक्ष असून योजनेच्या बुडीत क्षेत्रापैकी 57 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आलेले आहे. या योजनेची स्थगिती उठल्याने लवकरच या योजनेची निविदा प्रक्रिया राबविण्यात येऊन कामाला सुरुवात होणार आहे.

किती निधी मिळाला?

येवला तालुक्यातील देवानासह 21 योजनांवरील स्थगिती उठविण्यात आली आहे. यामध्ये राजापूर-1 गेटेड सि. कॉ. बंधाऱ्यासाठी 61 लाख 55 हजार, राजापूर – 2 गेटेड सि. कॉ. बंधाऱ्यासाठी 62 लाख 9 हजार, राजापूर – 3 गेटेड सि. कॉ. बंधाऱ्यासाठी 61 लाख 18 हजार, राजापूर – 4 गेटेड सि. कॉ. बंधाऱ्यासाठी 67 लाख 40 हजार, राजापूर – 5 गेटेड सि. कॉ. बंधाऱ्यासाठी 60 लाख 57 हजार, राजापूर – 6 गेटेड सि. कॉ. बंधाऱ्यासाठी 62 लाख, राजापूर – 7 गेटेड सि. कॉ. बंधाऱ्यासाठी 60 लाख 53 हजार, राजापूर – 8 गेटेड सि. कॉ. बंधाऱ्यासाठी 60 लाख 59 हजार निधी मंजूर आहे.

बंधाऱ्यांसाठी किती तरतूद?

ममदापूर 4 गेटेड सि. कॉ. बंधाऱ्यासाठी 69 लाख 91 हजार, ममदापूर 5 गेटेड सि. कॉ. बंधाऱ्यासाठी 70 लक्ष 11 हजार, ममदापूर 6 गेटेड सि. कॉ. बंधाऱ्यासाठी 50 लाख 34 हजार, ममदापूर 7 गेटेड सि. कॉ. बंधाऱ्यासाठी 69 लाख 46 हजार, ममदापूर 8 गेटेड सि. कॉ. बंधाऱ्यासाठी 52 लाख 13 हजार, खरवंडी 5 गेटेड सि. कॉ. बंधाऱ्यासाठी 60 लक्ष 63 हजार, खरवंडी 6 गेटेड सि. कॉ. बंधाऱ्यासाठी 53 लाख 54 हजार, राहडी 1 गेटेड सि. कॉ. बंधाऱ्यासाठी 97 लाख 52 हजार, राहडी 2 गेटेड सि. कॉ. बंधाऱ्यासाठी 50 लाख 40 हजार, सोमठाणजोश 1 गेटेड सि. कॉ. बंधाऱ्यासाठी 61 लाख 22 हजार, सोमठाणजोश 2 गेटेड सि. कॉ. बंधाऱ्यासाठी 60 लाख 80 हजार, सोमठाणजोश 3 गेटेड सि. कॉ. बंधाऱ्यासाठी 58 लाख 22 हजार या योजनांसाठी 12 कोटी 50 लाख 18 हजार रुपये निधी मंजूर असून, लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येऊन कामास सुरुवात होणार आहे. त्यामुळे येवला तालुक्यातील सिंचन क्षमता अधिक वाढणार आहे.

इतर बातम्याः

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?

हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो.
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना.
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी.
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....