गोदावरीचे पाणी मिनरल वॉटरसारखे; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा अजब दावा, पर्यावरणप्रेमी गोंधळले
नाशिकच्या गोदावरी नदीच्या प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) नदीचे पाणी स्वच्छ असल्याचा दावा केला आहे. MPCB ने सहा ठिकाणी पाण्याचे नमुने घेऊन वॉटर क्वालिटी इंडेक्स (WQI) तपासला, जो "गुड टू एक्सलंट" होता.

नाशिकच्या गोदावरी नदीच्या प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. गोदावरी नदीपात्रात ठिकठिकाणी पानवेलीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी गटार आणि नाल्याचे पाणी नदी पात्रात सोडले जात असल्याने प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नाशिकच्या गोदावरी नदीबद्दल एक अजब दावा केला आहे. गोदावरी नदीतील पाणी स्वच्छ असल्याचे आकडेवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केली आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी शंका उपस्थित केली आहे.
नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीचे सहा ठिकाणाहून पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. या पाण्याची WQI म्हणजे वॉटर क्वालिटी इंडेक्स तपासण्यात आले. याच तपासणीत नदीतील पाणी स्वच्छ आहे आणि नदी प्रदूषित नाही असा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नाशिकच्या गोदावरीतील पाण्याला गुड टू एक्सलंट असा शेरा दिला आहे. गुड टू एक्सलांट हा शेरा मिनरल वॉटरच्या पाण्याला दिला जातो. याचाच अर्थ गोदावरीचे पाणी पिण्यायोग आहे, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने सांगितले आहे.
सरकार खरं की MPCB चां अहवाल खरा?
नद्यांच्या प्रदूषणासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वक्तव्य केले होते. त्यांच्यावर टीकेची झोड उठली असली, तरी नाशिकच्या गोदावरी च्या पाण्याबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळांना केलेल्या दाव्यामुळे सगळेच चक्रावले आहेत. नाशिकच्या गोदावरीचे पाणी गुड टू एक्सलंट या कॅटेगिरी म्हणजेच तुलनेत असल्याचं प्रदूषण नियंत्रण महामंडळाने म्हटलं आहे. विशेष म्हणजे गोदावरी प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कोट्यवधींचा निधी खर्च करत असताना MPCB ने केलेल्या दाव्यामुळे सरकार खरं की MPCB चां अहवाल खरा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नद्यांच्या प्रदूषणाच्या संदर्भात केलेलं वक्तव्य वादग्रस्त ठरला. मात्र नाशिकच्या प्रदूषण नियंत्रण मंडळांना दिलेला गोदावरीच्या नदी संदर्भातील अहवाल हास्यस्पद आणि धक्कादायक ठरला. गंगापूर धरण ते रामकुंड या गोदावरीच्या प्रवाहातील पाणी मिनरल वॉटर असतं. त्या दर्जाचं असल्याचा अप्रत्यक्ष दावाच प्रदूषण महामंडळांना केला. गंगापूर ते तपोवनदरम्यान गोदावरीच्या पाण्याचे सहा नमुने घेऊन हे तपासले असता हा निष्कर्ष समोर आल्याचं प्रदूषण नियंत्रण महामंडळाने म्हटलं आहे.
गोदा प्रदूषण मुक्त करण्यासाठी भरीव निधीची मागणी
एकीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळांनी हा दावा केलेला असताना दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी गोदा प्रदूषण मुक्त करण्यासाठी भरीव निधीची मागणी केली आहे. त्यामुळे गोदावरी प्रदूषित आहे की नाही हाच गोंधळ अजून प्रशासकीय यंत्रणेचा सुटलेला नाही.