नाशिकमध्ये निवडणुकीचे वारे बेफाम; आयटी पार्कसाठी लगीनघाई, 2 लाख रोजगार निर्मितीचा दावा, कधी फुटणार नारळ?

आयटी पार्क ज्या भागात उभारले जात आहे. त्या भागात केवळ बिल्डरांच्या जमिनी असून या आयटी पार्कसाठी ज्या सुविधा उभारल्या जातील, त्यातून केवळ त्या भागातील बिल्डरांच्या जमिनीचा भाव वाढून त्याचा फायदा केवळ बिल्डरांना होईल, असा आरोप होत आहे.

नाशिकमध्ये निवडणुकीचे वारे बेफाम; आयटी पार्कसाठी लगीनघाई, 2 लाख रोजगार निर्मितीचा दावा, कधी फुटणार नारळ?
Nashik Municipal Corporation
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 11:51 AM

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) ऐन महापालिका (Municipal Corporation) निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपने (BJP) बहुचर्चित अशा आयटी पार्कच्या शिडात हवा भरलीय. येत्या 1 मार्च रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थिती विविध करार करून उद्घाटनाचा नारळ फोडण्याचा इरादा पक्का केलाय. नाशिकमधील आडगाव-म्हसरूळ शिवारात 335 एकर जागेवर हे आयटी हब उभारण्यात येणारय. त्यासाठी भाडेतत्वावर जागा द्यायला जागामालक राजी असल्याचे समजते. महापालिका आणि आयटी डेव्हलपर यांच्या यासाठी करार होईल. त्यांना 33 वर्षांच्या भाडेकरारावर ही जागा मिळेल. त्यामुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात रोजागार निर्मिती होईल. तरुणांना इतर शहरात वणवण भटकावे लागणार नाही, अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली आहे.

20 कोटी रुपये मंजूर

मुंबई-पुणे नंतर आता नाशिकमध्ये सुद्धा आयटी हब होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला असून, आयटी हब उभारण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधांसाठी 20 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या पार्कमुळे नाशिकमधील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. शहरात दोन लाख रोजगार निर्माण होतील. मुलांना आयटी हबसाठी मुंबई, पुणे, बंगळुरूला जावे लागणार नाही, असा दावा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला आहे.

भाजपमधून विरोध

आयटी पार्क ज्या भागात उभारले जात आहे. त्या भागात केवळ बिल्डरांच्या जमिनी असून या आयटी पार्कसाठी ज्या सुविधा उभारल्या जातील, त्यातून केवळ त्या भागातील बिल्डरांच्या जमिनीचा भाव वाढून त्याचा फायदा केवळ बिल्डरांना होईल, असा आरोप होत आहे. विशेषतः आयटी हबचा विषय महासभेत आणण्यापूर्वी आर्थिक देवाणघेवाण झाली असून आपण या विरोधात अँटी करप्शन विभागाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा भाजपाच्याच नगरसेवकांनी यापूर्वी दिला होता.

शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचीही हरकत

विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना, काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रावादीच्या नगरसेवकांनी देखील होऊ घातल्या IT हब उभारणीची प्रक्रिया संशयास्पद असल्याचा आरोप करत प्रक्रियेला विरोध यापूर्वीच केला आहे. शहरात अनेक जागा असून त्या इतर जागा सोडून एकाच जागेची निवड या हबसाठी का केली गेली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

इतर बातम्याः

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....