मेणबत्तीच्या उजेडात सॅनिटाईझ करताना भडका, नाशकात महिलेचा मृत्यू

घर सॅनिटाईझ करताना मेणबत्तीमुळे आगीचा भडका उडाला आणि रजबीया शेख भाजल्या, असा दावा केला जात आहे

मेणबत्तीच्या उजेडात सॅनिटाईझ करताना भडका, नाशकात महिलेचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 27, 2020 | 11:51 AM

नाशिक : मेणबत्तीच्या प्रकाशात सॅनिटाईझ करताना भडका उडाल्याने नाशिकमधील महिलेचा मृत्यू झाला. आगीचा भडका उडून 90 टक्के भाजलेल्या महिलेने उपचारादरम्यान चार दिवसांनी प्राण सोडले. (Nashik Lady succumbs to injury after burnt while sanitizing)

वीज पुरवठा खंडित झाल्याने रजबीया शेख यांनी घरात मेणबत्ती लावली होती. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी याच वेळी त्या आपले घरही सॅनिटाईझ करत होत्या. त्याचवेळी आगीचा भडका उडाला आणि रजबीया शेख भाजल्या, असा दावा केला जात आहे.

नाशिक शहरातील वडाळा गावात ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातात रजबीया 90 टक्के भाजल्या होत्या. त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते.

गेल्या सोमवारी म्हणजे 20 जुलै रोजी रात्री ही घटना घडली होती. मात्र 24 जुलै रोजी मध्यरात्री नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा : साताऱ्यात सॅनिटायझर प्यायल्याने दोघांचा मृत्यू, लॉकडाऊनमध्ये दारु न मिळाल्याने धीर सुटला

मेणबत्तीच्या संपर्कात सॅनिटायझरमधील अल्कोहोलयुक्त पदार्थ आल्याने आगीचा भडका उडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. नाशिकमधील इंदिरानगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी आपले हात वारंवार धुवावे, सॅनिटायझर वापरावा, असे आवाहन अनेक वेळा केले जाते. मात्र ते वापरताना केलेली हलगर्जी जीवावर बेतू शकते, याचे उदाहरण समोर आले आहे.

(Nashik Lady succumbs to injury after burnt while sanitizing)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.