Nashik leopard | सावजाच्या शोधात असलेला बिबट्या अखेर जाळ्यात; पण तरीही भीती कायम, कारण…

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चांदोरी येथे मुक्तसंचार करत जनावरांवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यात आला आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिक आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Nashik leopard | सावजाच्या शोधात असलेला बिबट्या अखेर जाळ्यात; पण तरीही भीती कायम, कारण...
प्रतिनिधीक फोटोImage Credit source: social
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 12:19 PM

नाशिकः गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक (Nashik) जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चांदोरी येथे मुक्तसंचार करत जनावरांवर हल्ला करणारा बिबट्या (leopard) अखेर जेरबंद करण्यात आला आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिक आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. चांदोरी येथील जगन्नाथ सोनवणे यांच्या शेतात बिबट्याचा मुक्तसंचार सुरू होता. त्यामुळे वनविभागाने (Forest Department) या ठिकाणी एक पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात आज पहाटेच्या दरम्यान सावजच्या शोधात आलेला बिबट्या अडकला. मात्र, अजूनही दोन ते तीन बिबटे या परिसरात असल्याने त्यांनाही जेरबंद करा. हा परिसरा बिबट्या मुक्त करावा, अशी मागणी यावेळी वन विभागाकडे जगन्नाथ सोनवणे यांच्यासह शेतकरी व नागरिकांनी केली. या बिबट्याला वन विभागाने ताब्यात घेत निफाड येथील रोपवाटिकेत बिबट्याला आणले आहे. हा बिबट्या अंदाजे पाच ते सहा वर्षांचा नर जातीचा असल्याची माहिती वन विभागाने दिली. या बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केल्यानंतर पुन्हा जंगलात सोडून देण्यात येणार आहे.

नागरिकांमध्ये भीती

नाशिक जिल्ह्यातल्या निफाड, येवला, चांदोरी, बेलगाव कुऱ्हे पंचक्रोशीत गेल्या वर्षीही बिबट्याचा वावर होता. त्याने अनेक गायी, म्हशी, वासरे, श्वान आदी पाळीव प्राण्यांचा फडशा पाडून शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणले होते. शेवटी नागरिकांच्या मागणीनंतर वनविभागाने पिंजरा लावला. त्यावेळेही या जाळ्यात बिबट्या अलगद अडकला होता. आता चांदोरीतला बिबट्याही पकडला आहे. मात्र, अजून दोन ते तीन बिबटे असल्याची भीती गावकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे हे बिबटे ही पकडावे, अशी मागणी होत आहे.

हिंस्त्र प्राणी वस्तीत

बिबट्यासारखा हिंस्त्र प्राणी वारंवार गाव आणि शहराकडे धाव घेण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. मानवाने प्राण्यांचा अधिवास बळकावला. जंगलांची अक्षरशः कत्तल केली. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. पर्जन्य चक्रात प्रचंड बदल झाले आहेत. एकाचवेळी अतिवृष्टी आणि एकाचवेळी दुष्काळाचा अनुभव आपण घेत आहोत. निसर्गाला ओरबाडने मानवाने थांबवले नाही, तर यापेक्षा भयंकर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा पर्यावरण तज्ज्ञ देत आहेत.

इतर बातम्याः

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.