Nashik VIDEO | चालत्या गाडीखाली साधू महाराज सापडले, बघ्यांच्या काळजाचा ठोका चुकला, पण नंतर…

नाशिकमधील मनमाड रेल्वे स्थानकावर ट्रेन निघत असताना एक साधू महाराज थेट फलाटावरुन रुळावर जाऊन पडले होते. आधी साधू महाराजांच्या जीवाचं बरं वाईट झालं असावं, असा ठोकताळा सर्वांनी बांधला होता.

Nashik VIDEO | चालत्या गाडीखाली साधू महाराज सापडले, बघ्यांच्या काळजाचा ठोका चुकला, पण नंतर...
रुळाच्या मधोमध पडल्याने साधू महाराज सुखरुपImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 8:18 AM

नाशिक : ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ या उक्तीचा प्रत्यय नाशिकमधील मनमाड रेल्वे स्थानकावरील (Manmad Railway Station) प्रवाशांना आला. धावती ट्रेन निघत असताना एक साधू महाराज थेट फलाटावरुन रुळावर जाऊन पडले. हे भयावह दृश्य पाहून उपस्थितांनी डोळे बंद केले. साधू महाराजांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असेल, या कुशंकेने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. ट्रेन धावतच असल्यामुळे (Running Train) सर्वच प्राण कंठाशी आणून पाहत होते. मात्र साधू महाराजांचे दैव इतके बलवत्तर की ते रुळाच्या मधोमध पडल्याने बचावले. या घटनेचा व्हिडीओ (Nashik Video) समोर आला आहे.

नेमकं काय घडलं?

नाशिकमधील मनमाड रेल्वे स्थानकावर ट्रेन निघत असताना एक साधू महाराज थेट फलाटावरुन रुळावर जाऊन पडले होते. आधी साधू महाराजांच्या जीवाचं बरं वाईट झालं असावं, असा ठोकताळा सर्वांनी बांधला होता. मात्र दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या लोकांनी त्याला सुखरुप असल्याचं पाहिल्यानंतर तसेच पडून राहा, कोणतीही हालचाल करु नका, डोके वर काढू नका, अशा हातांनी खुणा करुन सूचना दिल्या.

गाडी थांबली आणि साधू सुखरुप बाहेर

लोकांच्या सल्ल्यानुसार साधू महाराज तसेच रुळावर आडवे पडून राहिले होते. त्यांच्या अंगावरुन 6 ते 7 डबे गेले. अखेर गाडी थांबली आणि साधू महाराज सहीसलामत बाहेर आले. त्यांना विशेष दुखापतही झाली नव्हती.

अंगावर शहारे आणणारा हा सर्व थरार एका वेंडरने त्याच्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला होता. साधूचे नशीब बलवत्तर होते म्हणून त्यांना जीवदान मिळाले.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

CCTV | धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न जीवावर, मुंबईत रेल्वे कर्मचाऱ्याचा धडकून मृत्यू

ट्रेन आणि जेसीबीची भयानक टक्कर, तरीही चालक सुखरूप बचावला, पाहा व्हायरल व्हिडिओ!

देव तारी त्याला कोण मारी! अख्खी मालगाडी अंगावरून गेली पण पठ्ठ्याला खरचटलंही नाही..! पाहा Video

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.