नाशिकः नाशिकचे मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर (Dilip Datir) यांना अखेर अटक करण्यात आली आहे. भोंग्यांविरोधात मनसेने पुकारलेल्या आंदोलनानंतर ते फरार होते. नाशिकच्या सातपूर पोलिसांकडून (Nashik Police) ही कारवाई करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आवाहनानंतर नाशिकमध्ये भोंग्यांविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. पहाटेच्या वेळीच अजान सुरु होताच मनसे कार्यकर्त्यांनी विरोध करायला सुरुवात केली होती. त्या दिवशीच अनेक मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
मनसेचा गड म्हणून ओळखला जातो. राज ठाकरेंनी भोंग्यांविरोधात आंदोलनाचा आदेश दिल्यानंतर नाशिक येथी मनसैनिक प्रचंड आक्रमक झाले होते. यादरम्यान नाशिक मनसे शहराध्य दिलीप दातीर, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार हे दोघेही फरार होते. शहराध्यक्ष दिलीप दातीर यांना दोन दिवसांनी सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र जिल्हाध्यक्ष अंकुश पवार अद्यापही फरार आहेत. यापूर्वीदेखील मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. अनेकांना ताब्यात घेतलेलं आहे. या आंदोलनाचं नियोजन करण्यासाठी जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांनी मोठी भूमिका बजावली होती. जिल्हाध्यक्ष अंकुश पवारांचा शोध पोलीस घेत आहेत.
राज ठाकरेंनी आदेश दिल्यानंतर नाशिकच्या मनसे कार्यकर्त्यांनी 04 मे रोजी पहाटेच्या सुमारास मोठं आंदोलन छेडलं. पहाटे अजान सुरु होताच मनसे कार्यकर्त्यांनी विरोध केला. पोलिसांनी तातडीने या कार्यकर्यांना ताब्यात घेतलं. नाशिकमधील दूध बाजार येथील मिशदीत अजान सुरु होताच मनसे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक सुजाता डेरे यांनी श्रीरामाच्या घोषणा देत तीव्र विरोध केला. पोलिसांनी याठिकाणीही धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतलं.