नाशिक: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी मशिदीवरून (masjid) भोंगे हटवले नाही तर हनुमान चालिसा सुरू करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मनसेच्या (mns) पदाधिकाऱ्यांमध्येच नाराजी पसरली आहे. ज्या मनसे नेत्यांचा मतदारसंघ मुस्लि बहूल आहेत, त्या भागातील मनसे नेत्यांची मोठी कोंडी झाली आहे. तर मनसेच्या मुस्लिम नगरसेवकांचीही या मुद्द्यावरून अडचण झाली आहे. राज ठाकरेंच्या भोंगे काढण्याच्या भूमिकेला समर्थन देणारे मनसे नगरसेवक सलीम शेख यांच्या विरोधात मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे. सलीम शेख यांना एका मुस्लिम युवकाने फोन करून या प्रश्नी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. या मुस्लिम युवकाची आलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ‘तुम्ही मुस्लिम असूच शकत नाही, DNA टेस्ट करून घ्या’ असा अजब सल्लाच या तरुणाने सलीम शेख यांना दिला आहे. भोंगे काढताय, तर तुम्ही स्वत: हनुमान चालीसा देखील सुरू करा असा सल्ला दिला आहे. फोन करणारे जावेद मुल्ला हे जामनेरचे माजी उपनगराध्यक्ष असल्याचा फोनवरील व्यक्तीचा दावा आहे. या दोघांमध्ये झालेलं संभाषण खालीलप्रमाणे जसंच्या तसं.
फोन करणारा: सलीम भाई, तुम्ही प्रतिक्रिया दिली आहे. तुमच्या प्रतिक्रियेशी तुम्ही तरी सहमत आहात का? तुम्ही आज जे बोललात ते एकदम योग्य होतं का? मशिदीवर भोंगे असणं योग्य नाही का?
सलीम शेख: नाही.. नाही.. मी प्रतिक्रिया काय दिलीय? तुम्ही माझी प्रतिक्रिया नीट वाचा. त्यानंतर तुमच्या लक्षात येईल.
फोन करणारा: अच्छा. काय दिली तुम्ही प्रतिक्रिया?
सलीम शेख: मी कोर्टाच्या निर्णयावर बोललो. मी त्यावर बोललो. मी कायद्याबाबत बोललो आहे. बाकी काही बोललो नाही.
फोन करणारा: अच्छा, म्हणजे तुम्ही राज ठाकरेंचं समर्थन करत आहात तर. त्यांच्या समर्थनासाठी मग तुम्ही हनुमान चालिसाही म्हटला पाहिजे.
सलीम शेख: नाही.. नाही… का वाचू मी?
फोन करणारा: वाचला पाहिजे. मनसेच्या भगव्याच्या मुद्द्याशी तुम्ही सहमत झाला आहात. हनुमान चालिसा हा सुद्धा त्यांच्या धोरणाचा एक भाग आहे.
फोन करणारा: हॅलो…
सलीम शेख: जी
फोन करणारा: हनुमान चालिसाचंही तुम्ही आयोजन करा ना.
सलीम शेख: मी का करणार बरे?
फोन करणारा: तुम्ही असे करूच नये.
फोन करणारा: तुम्ही आता भोंग्याचा विरोध करत आहात. अनेक वर्षांपासून चालत आलेली ती परंपरा आहे. मुस्लिम असूनही तुम्ही भोंग्याला विरोध केला तर तुम्ही हनुमान चालिसा वाचला तरी काही फरक पडत नाही.
सलीम शेख: नाही, उद्या मी पत्रकार परिषद घेणार आहे.
फोन करणारा: नाही. तुम्ही हनुमान चालिसाच म्हटला पाहिजे.
सलीम शेख: नाही… नाही… उद्या मी पत्रकार परिषद घेतोय.
फोन करणारा: अच्छा… तुम्ही मीर जाफर… मीर जाफर यांचे वंशजच वाटत आहात.
फोन करणारा: माझं नाव जावेद मुल्लाजी आहे. मी जामनेवरून बोलत आहे. माजी उपनगराध्यक्ष आहे. माझं नाव लिहून ठेवा. तुम्ही तर मीर जाफर आणि मीर काफिनच्या वरचे वाटताय.
फोन करणारा: तुमचा DNA टेस्ट करून घ्या. तुम्ही मुस्लिम असूच शकत नाही.
फोन करणारा: तुम्ही एका खोट्या पदासाठी… हॅलो… एका बोगस पदासाठी तुम्ही कौमचा सौदा करत आहात.
संबंधित बातम्या:
मोठी बातमी ! वसंत मोरेंना मनसे पुणे शहरप्रमुख पदावरुन हटवले, भोंगा प्रकरणानंतर राज ठाकरेंचा निर्णय