नाशिक महापालिका आयुक्त हायरिस्कमध्ये, स्वीय सहाय्यकाला कोरोना, जिल्हा परिषदेतही शिरकाव
नाशिकमध्ये सरकारी कार्यालयात कोरोनाने शिरकाव केला आहे. नाशिक जिल्हा परिषद आणि महापालिकेत कोरोनाने शिरकाव केला आहे. Nashik commissioner high risk
नाशिक : नाशिकमध्ये सरकारी कार्यालयात कोरोनाने शिरकाव केला आहे. नाशिक जिल्हा परिषद आणि महापालिकेत कोरोनाने शिरकाव केला आहे. जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा विभागाचा क्लार्क कोरोना आढळला आहे. तर महापालिकेच्या नगररचना विभागातील कर्मचाऱ्यालाही कोरोनाची बाधा झाली. दुसरीकडे नाशिक महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे हे सुद्धा हायरिस्क झोनमध्ये आले आहेत. आयुक्तांच्या स्वीय सहाय्यकाला कोरोनाची लागण झाल्याने आयुक्तांसह इतर कर्मचारीदेखील हायरिस्क झोनमध्ये आले आहेत. सरकारी कार्यालये आता कोरोनाच्या विळख्यात सापडू लागल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे. (Nashik commissioner high risk )
नाशिकमध्ये रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. जी यंत्रणा कोरोनाविरोधात लढत आहे. तेच आता कोरोनाच्या विळख्यात येताना दिसत आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढला आहे. काल एकाच दिवसात तब्बल 124 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर 14 रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आता शहरवासियांची चिंता वाढू लागली आहे. दिवसागणिक नाशिक शहरात, ग्रामीण भागात कोरोना रुग्ण समोर येत असल्याने प्रशासनाचीही धावपळ उडाली आहे. त्यात नाशिक शहर आता कोरोना हॉटस्पॉट झाल्याने जिल्हा आरोग्य विभागही चिंतेच्या गर्तेत अडकला आहे.
जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा आता 2998 वर जाऊन पोहोचला आहे. यात नाशिक शहरातील रुग्ण संख्याच बाराशेच्या वर गेली आहे. मात्र स्थानिक नागरिकांनी धोका लक्षात घेता शहरातील अनेक भाग स्वयंस्फूर्तीने बंद ठेवला आहे.
दररोज शंभरच्या आसपास रुग्णांची भर
नाशिकमध्ये दिवसागणिक शंभरच्या आसपास रुग्ण शहरात आढळून येत असल्याने, आता प्रशासनाची चिंता वाढली आहे. शहरातील अनेक भागात आता कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पंचवटी परिसरही आता कोरोना हॉटस्पॉट बनल्याने, स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. मात्र जर कोणाला लक्षणे आढळून आल्यास तात्काळ शासकीय रुग्णालयात तपासणी करुन घ्या, असं आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केलं आहे. (Nashik commissioner high risk)
संबंधित बातम्या