बाजारपेठेत खरेदीला जाणा-या ग्राहकांवर टोल, मनपा आणि पोलिंसानी अनोखी शक्कल का लढवली?

नाशिककरांना खरेदीसाठी बाजारपेठेत जाताना आता टोल द्यावा लागणार आहे. Nashik Market Toll

बाजारपेठेत खरेदीला जाणा-या ग्राहकांवर टोल, मनपा आणि पोलिंसानी अनोखी शक्कल का लढवली?
नाशिक बाजारपेठ टोल
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 7:29 PM

नाशिक: जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही महत्वाची बातमी असून नाशिककरांना खरेदीसाठी बाजारपेठेत जाताना आता टोल द्यावा लागणार आहे. होय हे खरं आहे ग्राहकांना आता टोल म्हणजेच प्रवेश शुल्क द्यावे लागणार आहे. नाशिकमध्ये कोरोनाचा आलेख वाढत चालला असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि बाजारपेठेत होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी नाशिक महानगरपालिका आणि पोलिसांनी ही अनोखी शक्कल लढवलीय. (Nashik Municipal Corporation and Police impose toll on peoples for entry in vegetable markets)

बाजारात जाण्यासाठी टोल

नाशिक मधील प्रसिद्ध शालिमार मार्केटमध्ये पोलिसांचा फौजफाटा आणि महानगपालिकेचे कर्मचारी यांची लगबग पाहायला मिळाली. बाजारपेठेच्या चारीबाजुने बॅरिगेट लावून रस्ते अडवण्यात आलेत.बाजारपेठेत प्रवेश करताना आता प्रवेश शुल्क द्यावे लागणार आहे. खरेदीसाठी येणा-या प्रत्येक ग्राहकांला आता पाच रुपये टोल द्यावा लागणार आहे. एक तासा साठी हे शुल्क असणार आहेत. एक तासाहून अधिक काळ लागल्यास मात्र पाचशे रुपये दंड भरावा लागणार आहे. दंड करणे हा उद्देश नसून बाजारपेठेत होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी हा उपक्रम करत असल्याच नाशिकचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी म्हटलंय.

टोलवसुली जाचक

महानगरपालिकेकडून होत असलेली ही टोल वसुली जाचक असल्याची भावना बाजारपेठेत खरेदीसाठी येणा-या ग्राहकांनी व्यक्त केलीय. अनेकदा टोल भरण्यावरून ग्राहकांचे वाद देखील होत आहेत.एकीकडे ग्राहक नाराज आहेत.दुसरीकडे या परिसरात रहिवास करत असलेल्या नागरिकांनी विनाकारण मोकाट फिरणा-यांना चाप बसेल, अशी प्रतिक्रीया व्यक्त केलीय.

नाशिक जिल्हयात रविवारी 2925 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. कोरोनाची ही आकडेवारी प्रशासनासह नागरिकांची काळजी वाढवणारी असून प्रशासनाला वेगवेगळे प्रयोग करावे लागत आहेत. टोल वसुलीने नेमक काय साध्य होणार ? असा प्रश्न निमित्ताने उपस्थित होत आहे.

संबंधित बातम्या:

Special Report: महाराष्ट्रावर लॉकडॉऊनचे ढग? चांद्यापासून ते बांद्यापर्यंत 15 शहरं अ‍ॅलर्टवर; वाचा सविस्तर!

मुंबईतील पोलीस ठाण्यांच्या इमारतींची कामांना गती द्या, पालकमंत्री आदित्य ठाकरेंचे आदेश

(Nashik Municipal Corporation and Police impose toll on peoples for entry in vegetable markets)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.