नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) इतक्या दिवस गुडघ्याला बाशिंग बांधून महापालिकेसाठी (Municipal Corporation) जोरदार प्रचार करणाऱ्या, अनेक वॉर्डात चक्क साडेचार वर्षांनी उगवणाऱ्या नगरसेवकांचे आणि इच्छुकांच्या स्वप्नांचे अक्षरशः खोबरं झालं आहे. त्याचे कारण म्हणजे महाराष्ट्र सरकारने काल घेतलेला निर्णय. ओबीसींच्या (OBC) राजकीय आरक्षणाचे कारण देत राज्य सरकारने निवडणूक आयोगाचे सारे अधिकार स्वतःकडे घेतले. त्यामुळे इतक्या दिवस अगदी निर्धास्त वावरणाऱ्या आणि विजयाची आस ठेवून सारी कामे बिनबोभाट करणारे नगरसेवक आणि इच्छुकांची आता झोप उडाली आहे. शिवाय महापालिका निवडणूक लांबल्याचे टेन्शन वेगळेच. कारण काय, जाणून घेऊयात.
प्रभाग रचनेचा घोळ काय?
नाशिकमध्ये सध्याच्या प्रभाग रचनेत घोळ झाल्याचा आरोप अनेकांनी केला होता. एका नगरसेवकाच्या घरात बसून ही प्रभाग रचना तयार करण्यात आली. अनेकांचे पत्ते काटण्यात आले. काही विशिष्ट भाग विशिष्ट वॉर्डाला जोडले, असे आरोप झाले होते. सुनावणीतही यासंबंधीच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. तर काही जणांनी थेट कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता. मात्र, आता नव्या निर्णयाने राज्य सरकारने निवडणूक आयोगाचे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत. हीच बाब अनेकांना धास्ती भरवणारी आहे.
धास्ती नेमकी कशाची?
विरोधक आणि सत्ताधारी यांच्या एकमताने विधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाकडे आता फक्त निवडणूक घेण्याचे अधिकार ठेवण्यात आले आहेत. प्रभाग रचना करणे, कुठे आरक्षण देता येईल याबाबतचे अधिकार सरकारकडे आले आहेत. यामुळे राज्य सरकारला नव्याने प्रभाग रचना करण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा वेळ लागेल. या कालावधीत सरकार ओबीसी राजकीय आरक्षणासाठी लागणारा इम्पेरिकल डाटा गोळा करू शकते. यामुळे निवडणुका लांबतीलच. शिवाय प्रभाग रचनाही बदलेल. त्याने इतक्या दिवस प्रभाग रचनेसाठी केलेली खटाटोप वाया जाईलच. शिवाय पुन्हा कशी प्रभाग रचना होईल, हेच भाग कायम राहतील का, हे सांगणे अवघड आहे.
तयारीही गेली वाया
महापालिका निवडणुका एप्रिल महिन्यात होणार म्हणून अनेकांनी जोरदार तयारी सुरू केली होती. अनेक इच्छुकांनी प्रचार सुरू केला होता. तिकीट मिळणार की नाही, कोठल्या वॉर्डातून मिळणार, याचा काहीही विचार न करता अती आत्मविश्वासाने अनेक जण वावरत होते. मात्र, आता प्रभाग रचनेपासून सारे काही नव्याने होईल. त्यात पुन्हा काही तोडफोड झाली, वॉर्ड बदलले तर कसे, याची चिंता अनेकांना वाटतेय. त्यामुळे आतापर्यंतची तयारी आणि प्रचारही वाया गेल्याची खंत अनेक जण व्यक्त करतायत.
नाशिक – दिंडोरी सिटी बस सुरू; गामीण भागात वाढवला विस्तार, मार्ग काय राहणार?
मालेगाव महापालिकेचे प्रताप; पोलीस मैदानाच्या सरकारी जागेची इदगाह ट्रस्टला खिरापत