नाशिकः अखेर नाशिक महापालिका निवडणुकीसाठीच्या 133 जागांसाठी कच्च्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर झाला असून, त्यानुसार 43 प्रभाग 3 सदस्यीय, तर एक 4 सदस्यीय राहील. राज्य निवडणूक आयोगाने या कामासाठी 30 नोव्हेंबरची मुदत दिली होती. मात्र, अनेक बदल झाल्याने या कार्यक्रमास थोडा विलंब झाल्याचे समजते.
नाशिकमध्ये 2012 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेण्यात आला. त्यानंतर यावर्षी होणारी जनगणना कोरोनामुळे झाली नाही. त्यामुळे जुन्या जनगणनेनुसार प्रभागरचना करण्याचे काम सुरू आहे. या काळात शहराच्या लोकसंख्येत साधारणतः साडेतीन चार लाखांची वाढ झाली. सध्या अंदाजे 30 लाखांच्या घरात लोकसंख्या असल्याचे समजते. त्यामुळे शहरात 151 नगरसेवक असावेत, असा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र, त्याऐवजी नगरेसवकांची संख्या 122 वरून 133 अशी करण्यात आली. सध्या नाशिक महापालिकेत एकूण 61 प्रभाग आणि 122 नगरसेवक, तर पाच स्वीकृत नगरसेवक आहेत. सध्याच्या निवडणुकीत तीन सदस्यीय प्रभागरचना आहे. त्यानुसार नाशिकमधील प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम 6 ऑक्टोबरपासून सुरू झाले. ते 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करायचे होते. त्यानुसार नाशिक महापालिकेत 43 प्रभाग 3 सदस्यीय, तर एक 4 सदस्यीय राहणार असल्याचे समजते.
पुन्हा करावे लागेल काम
नाशिकमध्ये सुरुवातीला म्हणजे 26 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभागरचनेसाठी कच्चा आराखड्याचे काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन सदस्यीय प्रभागरचना झाली. त्यानुसार या कामात पुन्हा बदल झाला. मात्र, आता नगरसेवकांची संख्याही 122 वरून 133 वर नेण्यात आली. त्यामुळे आता पुन्हा या कामात बदल करावा लागणार आहे. पूर्वीच्या नियोजनानुसार साधरणतः 36 हजार लोकसंख्येचा एक प्रभाग होता. मात्र, नगरसेवकांची संख्या वाढल्यानंतर आता एका प्रभागाची लोकसंख्या 28 ते 30 हजारांच्या घरात असेल. त्यामुळे कच्च्या प्रभारचनेचे काम पुन्हा करावे लागेल.
प्रभागरचनेचे वेळापत्रक
नाशिक, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर महापालिकेसाठी 30 नोव्हेंबरची मुदत होती. नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूरसाठी 18 नोव्हेंबर, तर लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगावसाठी 25 डिसेंबरची मुदत आहे. पनवेल, मीरा-भाईंदर, नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी हे काम 15 फेब्रुवारीपर्यंत करावे लागेल.
महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल
भाजप 67
शिवसेना 34
काँग्रेस 6
राष्ट्रवादी 6
मनसे 5
इतर 3
सध्याचे प्रभाग
29 प्रभाग 4 सदस्यीय
2 प्रभाग 3 सदस्यीय
असे असतील नवे प्रभाग
43 प्रभाग 3 सदस्यीय
1 प्रभाग 4 सदस्यीय
(Nashik Municipal Election: 43 wards with 3 members and one with four members)
इतर बातम्याः
Jobs: ऐन दिवाळीत गोड बातमी, सिपेट प्रकल्प नाशिकमध्ये होणार; हजारो बेरोजगारांना नोकऱ्या मिळणार!
Special Report: तुझं हसणं माझ्या जगण्याची भाकरीय; जगात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या एका मुलखावेगळ्या कवीची गोष्ट!https://t.co/rIFR65qDOq#SpecialReport|#PabloNeruda|#Poet|#RevolutionaryPoet|#Chile
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 3, 2021