Nashik Municipal Election : नाशिकसह राज्यातल्या 18 महापालिका निवडणुकीवर आज सर्वोच्च न्यायलयात फैसला; निर्णयाची उत्सुकता शिगेला

नाशिकसह (Nashik) राज्यातल्या 18 महापालिकांच्या (Municipal Corporation)निवडणुका (Election) कधी होणार, याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयात लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकराने ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे निवडणूक विभागाने केलेली प्रभागरचना रद्द केली. पुढे नव्याने प्रक्रिया करण्याचे अधिकार स्वतःकडे घेतले. या निर्णयाने निवडणूक प्रक्रिया ठप्प आहे. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, त्यावर आज सुनावणी होणार आहे.

Nashik Municipal Election : नाशिकसह राज्यातल्या 18 महापालिका निवडणुकीवर आज सर्वोच्च न्यायलयात फैसला; निर्णयाची उत्सुकता शिगेला
supreme courtImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 5:12 PM

नाशिकः नाशिकसह (Nashik) राज्यातल्या 18 महापालिकांच्या (Municipal Corporation)निवडणुका (Election) कधी होणार, याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयात लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकराने ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे निवडणूक विभागाने केलेली प्रभागरचना रद्द केली. पुढे नव्याने प्रक्रिया करण्याचे अधिकार स्वतःकडे घेतले. या निर्णयाने निवडणूक प्रक्रिया ठप्प आहे. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, त्यावर आज सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे या साऱ्या रणधुमाळीत आता राज्य सरकारने नाशिक महापालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभागरचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय विरोधात जाण्यापूर्वीच सरकारने निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे दिसते. मात्र, या आदेशाने महापालिकेचा निवडणूक विभाग गोंधळून गेला आहे. कारण नाशिक महापालिकेसाठी सध्या राज्य निवडणूक आयोगाच्या 28 डिसेंबर 2021 व 27 जानेवारी 2022 रोजीच्या सूचनांनुसार त्रिसदस्यीस प्रारूप प्रभागरचना तयार करण्यात आली असून, ती अंतिम झाली आहे. मात्र, आता राज्य शासनाने याच नियमांना डोळ्यासमोर ठेवून नव्याने प्रभागरचना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावर नेमके करायचे काय, अशी विचारणा महापालिकेच्या निवडणूक विभागाने आयुक्तांकडे केली आहे.

मे अखेरीस मतदान?

कायद्यापेक्षा राज्यघटना श्रेष्ठ गृहीत धरून सर्वोच्च न्यायालय निवडणुका घेण्याचे आदेश देऊ शकते. तसे झाले तर नाशिक महापालिकेची राज्य निवडणूक विभागाने अंतिम केलेली प्रभागरचना तातडीने जाहीर केली जाईल. त्यानंतर ओबीसी आरक्षण वगळून सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गासाठी आरक्षण काढण्यात येईल. त्यानंतर 44 प्रभागांतील किती जागा स्त्री, पुरुष यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर सूचना आणि हरकती मागवून साधरणतः एप्रिलच्या शेवटी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. असे घडलेच तर मे अखेरीस मतदान होऊ शकते.

प्रगारचना कशी झाली?

नाशिक महापालिकेच्या 133 जागांसाठी 3 सदस्यीय पद्धतीने 44 प्रभागांच्या कच्च्या रचनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. नाशिकमध्ये सुरुवातीला म्हणजे 26 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभाग रचनेसाठी कच्चा आराखड्याचे काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन सदस्यीय प्रभाग रचना झाली. त्यानुसार या कामात पुन्हा बदल झाला. नगरसेवकांची संख्याही 122 वरून 133 वर नेण्यात आली. त्यामुळे या कामात पुन्हा बदल करावा लागला. पूर्वीच्या नियोजनानुसार साधरणतः 36 हजार लोकसंख्येचा एक प्रभाग होता. मात्र, नगरसेवकांची संख्या वाढल्यानंतर आता एका प्रभागाची लोकसंख्या 33 हजारांच्या घरात असेल. त्यामुळे कच्च्या प्रभाग रचनेचे काम पुन्हा करावे लागले. ही प्रभागरचना अंतिम झाली आहे. आज निवडणुका घेण्याचा आदेश आल्यास या प्रभागरचनेनुसार निवडणूक होईल. इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.