Nashik | महापालिका निवडणूक बारगळणार का, पुन्हा कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष, कारण काय?

नाशिक महापालिकेची मुदत येत्या 15 मार्च रोजी संपणार आहे. खरे तर तोपर्यंत निवडणुका होऊन महापालिकेला नवे कारभारी मिळायला हवेत. किमान या काळात आचारसंहिता तरी लागलेली असावी. मात्र, तसे नाही झाले तर...

Nashik | महापालिका निवडणूक बारगळणार का, पुन्हा कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष, कारण काय?
Nashik Municipal Corporation.
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 9:16 PM

नाशिकः नाशिक (Nashik) महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Election) प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली. त्यासाठी आक्षेप नोंदवण्यासाठीही सुरुवात झाली. मात्र, तरीही ही महापालिका निवडणूक बारगळणार अशीच चिन्हे दिसत आहेत. त्याला कारण म्हणजे ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) सुरू असलेला घोळ. ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी स्वाक्षरी केलीय. ओबीसी आरक्षणाशिवाय महापालिकेसह इतर कुठल्याच निवडणुका नको, अशी सर्वपक्षीयांची भूमिका आहे. त्यामुळे जोपर्यंत न्यायालय ओबीसी आरक्षणावर शिक्कामोर्तब करत नाही, तोपर्यंत या निवडणुका होण्याची शक्यता कठीणय. आता ओबीसी आरक्षणावर येत्या 8 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याकडे साऱ्याच राजकीय पक्षांच्या नजरा लागल्या आहेत.

पुढे काय होणार?

नाशिक महापालिकेची मुदत येत्या 15 मार्च रोजी संपणार आहे. खरे तर तोपर्यंत निवडणुका होऊन महापालिकेला नवे कारभारी मिळायला हवेत. किमान या काळात आचारसंहिता तरी लागलेली असावी. मात्र, तसे नाही झाले तर महापालिकेवर प्रशासकीय राजवट येऊ शकते. सध्या जिल्ह्यातील बाजार समितीच्यांच्या निवडणुकाही या ना त्या कारणाने सतत लांबणीवर पडताना दिसत आहेत.

‘मनसे’ एकट्याने लढणार

राज्यात नाशिकसह मुंबई, पुणे, ठाणे महापालिकेच्या निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकट्याने लढण्याची शक्यता आहे. तसे संकेत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत. आगामी महापालिका निवडणुका पाहता राज ठाकरे यांनी मुंबईत कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महापालिका निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना दिल्या. यापूर्वी भाजप आणि मनसेमध्ये युती होणार, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी ही शक्यता यापूर्वीच फेटाळून लावलीय. हे पाहता या निवडणुका मनसे एकट्याने लढणार आहे.

‘राष्ट्रवादी’चेही स्वबळ…

सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत ही आघाडी होते का, हे पाहणे उत्सुकतेचे आहे. यापूर्वी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी सहकारी पक्षांना आघाडीचे आवाहन केले होते. कोणी पुढे आले नाही, तर स्वबळावर महापालिका निवडणूक लढवू असा इशाराही दिला होता. मात्र, त्यानंतरही काँग्रेस आणि शिवसेनेने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आघाडीत बिघाडी होणार का, अशी चर्चा सुरूय.

अशी होणार निवडणूक…

– त्रिसदस्यीय पद्धतीने प्रभाग

– आता 133 नगरसेवक

– एकूण प्रभाग 44

– 43 प्रभाग 3 सदस्यीय

– 1 प्रभाग 4 सदस्यीय

पक्षीय बलाबल

– भाजप – 66 (एका नगरसेवकाचे निधन. सध्या 64)

– शिवसेना – 35 (सध्या 33)

– राष्ट्रवादी – 6

– काँग्रेस – 6

– मनसे – 5

– अपक्ष – 4

इतर बातम्याः

Nashik | प्रारूप प्रभाग रचनेत धक्क्यावर धक्के, अनेक नगरसेवक गॅसवर; महापौरांनाही जोर का झटका धीरे से…

टेन्शन खल्लास, नाशिक जिल्ह्यात अंगणवाडी केंद्रातच काढून मिळेल मुलांचे आधार कार्ड; काय आहे योजना?

Nashik | ‘महाडीबीटी’ पोर्टल संथ, विद्यार्थी हैराण; शिष्यवृत्तीसाठी कधीपर्यंत करता येणार अर्ज?

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.