नाशिक महापालिकेच्या ताफ्यात 100 नव्या सिटी बस!

दिवाळीपासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. त्यामुळे खासगी वाहनातून प्रवास करताना अव्वाच्या सव्वा लूट सुरू आहे. हे पाहता सिन्नर ,ओझर, त्रंबकेश्वर, भगूर, गिरणारे, सायखेडा, मखमलाबाद या ग्रामीण भागातून सिटीलिंक बसला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

नाशिक महापालिकेच्या ताफ्यात 100 नव्या सिटी बस!
नाशिकमध्ये महापालिकेच्या ताफ्यात शंभर नव्या बस दाखल होणार आहेत.
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 10:57 AM

नाशिकः नाशिककरांसाठी (Nashik) एक आनंदाची बातमी. महापालिकेच्या (Municipal Corporation) ताफ्यात आता 100 नव्या सीएनजी सिटी बस (City Bus) येणार आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी आवश्यक असणारा पाथर्डी फाटा येथील सीएनजी गॅस प्रकल्पही सुरू झालाय. या निर्णयामुळे शहरातील सिटी बसची संख्या वाढणार आहेच. सोबत इतक्या दिवस तोट्यात असणाऱ्या व्यवस्थापनाला आर्थिक बळही मिळणार आहे. इंधन म्हणून डिझेलच्या तुलनेत सीएनजी स्वस्तच पडते. एका बसला 120 किलो सीएनजी लागतो. त्यानुसार आर्थिक जुळवाजुळव सुरू आहे. नाशिकमध्ये सिटीलिंक बससेवेची 8 जुलै 2021 पासून सुरुवात झाली. त्यात पाच टप्प्यात 250 बस रस्त्यावर उतवण्याचे नियोजन आहे. सध्या सीएनजीवर चालणाऱ्या 100 आणि डिझेलवर चालणाऱ्या 50 बस आहेत. उर्वरित 100 बसला सीएनजी मिळत नसल्याने त्या बंद होत्या. मात्र, पाथर्डी येथील महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने 2 मार्च रोजी प्रकल्पाचा नारळ फोडला. त्यामुळे महापालिकेचा बस सुरू करण्याचा मार्ग सुकर झाला.

तोटा कमी होणार

पाथर्डी येथील गॅस प्रकल्पातून रविवारी महापालिकेला 1200 किलो इतके सीएनजी मिळणार आहे. त्यानुसार सोमवारी 15 बस सुरू होणार आहेत. एप्रिलपर्यंत 12000 किलो सीएनजी मिळणार आहे. त्यामुळे महिनाभरात 100 सीएनजी बस रस्त्यावर धावणार आहेत. नाशिक महानगरपालिकेने सुरू केलेल्या सिटीलिंक बससेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, दिवसाकाठाचे उत्पन्न वाढूनही सेवा तोट्यात जात होती. आता सीएनजीवर सिटी बस धावल्या तर इंधन खर्चात बचत होणार आहे. त्यामुळे बस व्यवस्थापनाचा तोटाही कमी होणार आहे.

चाकरमान्यांना मोठा आधार

दिवाळीपासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. त्यामुळे खासगी वाहनातून प्रवास करताना अव्वाच्या सव्वा लूट सुरू आहे. हे पाहता सिन्नर ,ओझर, त्रंबकेश्वर, भगूर, गिरणारे, सायखेडा, मखमलाबाद या ग्रामीण भागातून सिटीलिंक बसला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नाशिक उद्योनगरी. ग्रामीण भागातून अनेक कामगार नाशिकमध्ये रोजगारासाठी येतात. त्यांना रोज खासगी वाहनाने प्रवास करून येणे अवघड असते. सातपूर भागात अनेक कामगारांचा रोज राबता असतो. त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवण्यासाठी सिटीलिंक बससेवेने उत्तम जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे हे कामगार रोज सिटर रिक्षातून असुरक्षित प्रवास करण्याऐवजी थेट सिटीलिंक बससेवेचा पर्याय निवडत आहेत.

इतर बातम्याः

चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!

कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.