सुट्टीवर आलेल्या जवानाचा भीषण अपघात, ट्रॅक्टर आणि दुचाकीचा अपघात पाहून गावकरी हळहळले
भारतीय सैन्य दलात असलेले अनेक जवान सुट्टीवर आलेले असताना नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असतांना त्यांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नुकताच एक सटाणा येथ अपघात झाला आहे.
नाशिक : गेल्या महिन्यापासून जवानाच्या अपघाती मृत्यूची जवळपास ही तिसरी घटना आहे. सिन्नर येथे मागील महिण्यात दोन जवानांचा अपघाती मृत्यू झाला होता. खरंतर सुट्टीवर आलेले जवान नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असतांनाच हे अपघात झाले आहे. तर यामध्ये देवदर्शन करून परतत असतांना अपघात झाल्याचे समोर आले आहे. आता नुकताच एक साक्री ते शिर्डी या महामार्गावर अपघातात एका जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कांद्याच्या भरलेला ट्रॅक्टरला दुचाकी वरुन जात असलेल्या जवानाने ओव्हरटेक करत असतांना अचानक ट्रॅक्टर चालकाने वळण घेतल्याने हा अपघात झाला आहे. अपघातात जवान थेट कांद्याने भरलेल्या ट्रॉली खालीच आल्याने जवानाचा जागेवर मृत्यू झाला आहे.
साहेबराव सोनवणे असं अपघातात मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. यामध्ये साहेबराव हे छत्तीसगड येथे कार्यरत होते. तीन दिवसांपूर्वीच ते सुट्टीवर आले होते. आज दासवेल ला मामाच्या गावी गेले होते.
मामाला भेटून ते संध्याकाळी घरी परतत असतांना त्यांचा विरगाव फाट्यावर अपघात झाला. या ट्रॅक्टर आणि दुचाकीत हा अपघात झाला होता. त्यात जागेवरच जवान साहेबराव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असतांना झालेला अपघात भीषण होता. अपघात घडल्यानंतर गावकऱ्यांनी तात्काळ धाव घेत साहेबराव सोनवणे यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. रुग्णवाहिका बोलावण्यात आली मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
उपचारासाठी साहेबराव यांना सटाणा येथे घेऊन गेले होते. मात्र, त्यापूर्वीच मृत्यू झाल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठीचा वेळ मिळाला नाही. अपघाताची माहिती मिळताच सटाणा पोलिस ठाण्याचे पोलिस तात्काळ दाखल झाले होते.
सटाणा येथील वीरगाव फाट्यावर झालेल्या अपघातात जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात जवानाच्या मृत्यूनंतर रस्ते अपघाताचा विषय पुन्हा एकदा समोर आला आहे.
मागील महिण्यात सिन्नर येथे दोन जवानांचा अपघाती मृत्यू झाला होता. जवान सुट्टीवर आल्यानंतर आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असतात. त्यात घरी परतत असतांना किंवा जातांनाच अपघाती निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते.
काही दिवसांची असलेली सुट्टी जवान आनंदात घालवण्यासाठी आपल्या नातेवाईकांना भेटतात. कुटुंबासाठी वेळ देत असतात. कर्तव्य बजावत असतांना सुख दु:खात सहभागी होता न आल्याने सुट्टीत सगळ्यांना भेटून घेण्याचा विचार असतांना अचानक जवानाचे अपघाती निधन झाल्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.