तूफान राडा ! विद्यार्थीनी एकमेकींना भिडल्या, झिंज्या उपटल्या… जमीनीवर पडल्या तरीही… हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
नाशिकच्य सातपुर येथील एका हायस्कूल येथील विद्यार्थिनीमध्ये तुंबळ हाणामारी झाली असून व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. कॉलेजमधील हाणामारीचे लोण आता हायस्कूलमध्येही जाऊन पोहचलं आहे.
नाशिक : सध्या सोशल मीडियावर नाशिकच्या तरुणींची मोठी चर्चा आहे. त्याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर पुन्हा एकदा नाशिकच्या मुलींमध्ये तुंबळ हाणामारी ( Girlsfight ) झाली आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिकच्या नाशिक रोड परिसरामध्ये देखील असाच एक मुलींच्या हाणामारीचा व्हिडिओ समोर आला होता. त्या हाणामारी मागील कारण समोर आलं नसलं तरी या व्हिडिओची जोरदार चर्चा झाली होती. कॉलेजच्या गेटसमोरच तरुणी ( College student ) एकमेकींना भिडल्या होत्या एकमेकींच्या झिंज्या ओढत तूफान राडा झाला होता. याच्या आधीही शहरातील गंगापुर रोडवरील एका कॉलेजच्या आवारातील पार्किंग मध्ये मुलींचे दोन गट भिडले होते. त्यावेळी बॉयफ्रेंडवरुन हाणामारी झाल्याची बाब समोर आली होती.
नाशिकच्या तरुणी थेट एकमेकींना भिडत असल्याचे दिसून येत आहे. आता कॉलेजमधील मुलींच्या हाणामारीचे लोन हे हायस्कूल पर्यन्त जाऊन पोहचले आहे. दहावीचा पेपर झाल्यानंतर बाहेर आलेल्या मुलींमध्ये तूफान राडा झाल्याचे समोर आले आहे.
नाशिक शहरातील सातपूर परिसरात असलेल्या एका विद्यालयाच्या बाहेर दहावीत शिकणाऱ्या तरुणी ह्या किरकोळ कारणाहून दहावीचा पेपर सुटल्या नंतर आपापसात भिडल्या होत्या. भर रस्त्यावर या तरुणींची फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचे दिसून आले आहे.
नाशिक शहर आणि ग्रामीण भागात विद्यालयात माध्यमिक वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी यांच्यात किरकोळ कारणाहून वाद झाले, आणि या वादाचे परिवर्तन थेट हाणामारीत झाले. बघता बघता या भांडणात दोन तरुणींचे गट हे आपापसात भिडले होते.
हा संपूर्ण प्रकार उपस्थितीत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केला आहे. या तरुणींचा फ्री स्टाईल हाणामारीचा विडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मुलींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल #Nashik #Girlfights #ViralVideos pic.twitter.com/dHEgP8yZpx
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) March 14, 2023
यापूर्वीही नाशिक शहरात तीन ते चार वेळेस प्रकार घडले आहे. कधी बोलतांना झालेल्या वादावरुण तूफान राडा झाला आहे. तर कधी बॉयफ्रेंडवरुन तरुणी भिडल्या आहेत. मात्र, याच वेळी उपस्थित असलेल्या अनेक तरुणांनी व्हिडिओ काढून ते शेयर केल्याने जोरदार चर्चा होऊ होत असते.
आताही सातपुर येथील एका हायस्कूल मधील हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत शाळेकडून किंवा पोलिसांकडून कुठलीही दखल घेण्यात आली नसली तरी सोशल मीडियावर तरुणींच्या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
दरम्यान, नाशिकमधील मुली आपापसात भिडत असल्याने सोशल मिडियावर देखील नेटकऱ्यांनी हा व्हिडिओवरुन उलटसुलट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नाशिकमधील मुलींचा राडा नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.