थंडगार नाशिकला उन्हानं होरपळलं, महापालिकेने यासाठी केली एक थंडगार सोय

गेल्या आठवडा भरापासून तापमानाचा पारा वाढलेला असतांना आणि उन्हाळी सुट्टी असल्याने स्विमिंग पूल अक्षरशः फुल्ल झाले असून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

थंडगार नाशिकला उन्हानं होरपळलं, महापालिकेने यासाठी केली एक थंडगार सोय
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 6:33 PM

नाशिक : सध्या तापमानाचा पारा वाढत चालला आहे. अशातच मुलांना उन्हाळी सुट्टीही जाहीर झाली आहे. त्यामुळे उन्हापासून काहीसा दिलासा मिळावा याकरिता नागरिक स्विमिंग पूलचा आधार घेऊ लागले आहे. नाशिक महानगर पालिकेच्या चारही तरण तलावांना उन्हाळी सुट्ट्यांमुळे बच्चे कंपनीचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. खास महिलांसाठीही सुरु केलेल्या स्वतंत्र बॅच ही फुल्ल झाल्या आहेत. प्रशिक्षित जीवरक्षक, जलनिर्देशक, पाण्याची उत्तम गुणवत्ता, स्वच्छता, सुरक्षा रक्षक आणि हिरवागार परीसर अशी चारही तरण तलावांची वैशिष्ट आहेत. नाशिक रोड येथील राजमाता जिजाऊ तरण तलाव, गोल्फ क्लब येथील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव, नवीन नाशिक येथील स्वामी विवेकानंद जलतरण तलाव आणि सातपूर येथील जलतरण तलाव येथे पुरुष आणि महिलांसाठी बॅचेस सुरु आहेत.

नाशिक रोड आणि गोल्फ क्लब येथील तरण तलावात पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र पूल आहेत. तेथे एकूण सहा बॅच सुरु आहेत. सातपूर, नवीन नाशिक येथे मात्र सिंगल पूल आहे. तरी देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे.

चालू आर्थिंक वर्षात मनपाला चारही तलावांच्या व्यवस्थापनामधून 2 कोटी 14 लाख 71 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यात निम्मे उत्पन्न 1 कोटी 3 लाख रुपये स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाद्वारे मिळाले आहे.

हे सुद्धा वाचा

पुरुषांसाठी 50 बाय 25 फूट आकाराचा तर महिलांसाठी 25 बाय 23 फूट आकाराचा पूल आहे. 1 एप्रिलपासून चारही तरण तलाव मिळून सुमारे 25 हजार जणांनी लाभ घेतला आहे. त्यात प्रशिक्षणार्थी, मासिक पासधारक, वार्षिक पासधारक यांचा समावेश आहे.

तंदुरुस्त राहण्यासाठी पोहणे चांगला व्यायाम आहे. नाशिककर पालकांनी मनपाच्या जलतरणतलावांतील सुविधांचा लाभ घेऊन पाल्यांचा जरुर प्रवेश घ्यावा, महिला वर्गानेही स्पेशल बॅचेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन जलतरण तलावांचे मुख्य व्यवस्थापक रुपचंद काठे यांनी केले आहे.

विशेष म्हणजे याच तलावात अनेक खेळाडू देखील सरावासाठी येत असतात. त्यामुळे त्यांचेही मार्गदर्शन मिळत असल्याने नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यात तापमान वाढतच चालल्याने नागरिकांचेही पाऊले हळूहळू वळू लागले आहे.

नाशिक शहरात सध्याचे तापमान बघता 40 अंशाच्या वर गेले आहे. त्यामुळे स्विमिंग करून काहीसा गारवा मिळवण्यासाठी आणि व्यायाम देखील होत असल्याने नागरिकांचा प्रतिसाद वाढला आहे. यातून पालिकेच्या तिजोरीला हातभार लागत असल्याने पालिकेनेही मोठ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. अनुभवी प्रशिक्षक, चांगल्या दर्जाचे पाणी उपलब्ध करून दिले आहे.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.