भयंकर, मद्यधुंद अवस्थेत जळत्या चितेवर मारली उडी; नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार

पिंपळगाव बसवंत येथे एका मद्यधुंद तरुणाने नशेत जळत्या चितेवर उडी मारल्याची घटना घडलीय. या तरुणाला मृताच्या नातेवाईकांनी वाचवले. मात्र, अचानक घडलेल्या या प्रकाराने चांगलीच खळबळ उडाली.

भयंकर, मद्यधुंद अवस्थेत जळत्या चितेवर मारली उडी; नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार
पिंपळगाव बसवंत येथे एका मद्यधुंद तरुणाने जळत्या चितेवर उडी मारली.
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 2:04 PM

लासलगावः नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंत येथे एका मद्यधुंद (Drunk) तरुणाने जळत्या चितेवर उडी मारल्याची घटना घडलीय. या तरुणाला मृताच्या नातेवाईकांनी वाचवले. मात्र, अचानक घडलेल्या या प्रकाराने चांगलीच खळबळ उडाली. या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, पिंपळगाव बसवंत येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी (funeral) काही जण आले होते. त्यांनी विधी उरकल्यानंतर घराची वाट धरली. मात्र, तितक्यात एका तरुणाने चितेवर उडी मारली. हे पाहताच अमरधाममध्ये काम करणारे पंकज इरावत यांनी आरडाओरडा केला. घराकडे निघालेल्या नातेवाईकांनी चितेकडे धाव घेत त्या तरुणाला बाहेर काढले. त्याच्या अंगावर आगीमुळे अनेक ठिकाणी चटके बसल्याचे समोर आले आहे. असे कृत्य करणाऱ्या तरुणाला धड बोलताही येत नव्हते. तो पूर्णतः दारूच्या नशेत होता. त्याला धरल्यानंतरही तो चितेकडे ओढ घेत होता.

पुलावरून मारली उडी…

चितेवर उडी मारण्याने तरुणाने यापूर्वी कादवा नदीच्या पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही त्याला वाचवण्यात आले होते. चितेवर उडी मारल्यानंतरही तरुणाला मृतांच्या नातेवाईकांनी बाहेर काढले. त्याच्या अंगाला अनेक ठिकाणी पोळले. मात्र, त्यानंतरही त्याने उडी मारण्याचा प्रयत्न केला. शेवटी सगळ्यांनी मिळून त्याला दोरीने बांधले. त्यानंतर हा तरुण शांत झाला. तरीही अनेकवेळ त्याचा आरडाओरडा सुरू होता. या प्रकाराने सारेच गोंधळून गेले होते.

हा दुसरा प्रकार…

नाशिकमध्ये यावर्षी ज्येष्ठ कवी आणि, गीतकार विनायक पाठारे यांच्या अंत्यसंस्कारात दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार घडला होता. सरणाची लाकडे काढून ही हाणामारी झाली. त्यानंतर जिल्ह्यात चक्क चितेवर उडी घेण्याचा हा प्रकार घडला आहे. यामुळे शेवटच्या क्षणी तरी मृतांना शांतपणे जाऊ द्या, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. शिवाय दारू पिऊन मोकाट फिरणाऱ्या या तरुणावर घरातल्या मंडळींनी लक्ष द्यावे. अन्यथा असा प्रकार जीवावर बेतू शकतो, अशा प्रतिक्रियाही यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.