ऐतिहासिक रामसेतूवर पडणार हातोडा, अस्मितेसाठी नाशिककर एकवटले, प्रकरण काय?
नाशिकमध्ये यापूर्वी उड्डाणपुलाच्या नावाखाली अडीचशे वर्षांपूर्वीचा वटवृक्षत तोडण्याचा घाट घालण्यात आला होता. उंटवाडीत हा वटवृक्ष आहे. याविरोधात नाशिककर रस्त्यावर आले. त्यामुळे स्वतः पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांंनी हा वटवृक्ष वाचवण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर आता ऐतिहासिक रामसेतूबाबत तसेच होताना दिसत आहे.
नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) स्मार्ट सिटीच्या (Smart City) कारभारामुळे शहर खरेच स्मार्ट होतेय का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आता आलीय. त्याला कारणही तसेच आहे. कारण या कामासाठी ऐतिहासिक (historic) रामसेतू पूल पाडण्यात येणार असल्याचे समजते. या विरोधात जनआंदोलन उभे राहताना दिसत असून, नागरिकांनी पुढे येत या उफराट्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. शिवाय काही हालचाली केल्या, तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने या कामासाठी एकूण 294 कोटींचा निधी दिला होता. त्यापैकी तब्बल 205 कोटी रुपये पडून आहेत. मग नेमके स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरात काय सुरू आहे, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. नाशिक महापालिकेची निवडणूक जवळ आलीय. त्यामुळे आता या विषयावरून राजकारण पेटण्याची शक्यताय.
नेमके प्रकरण काय?
नाशिकमध्ये सध्या स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. त्यानिमित्त ठिकठिकाणी रस्ते खोदले आहेत. ही कामेही अतिशय संथ होतायत. काही दिवसांपूर्वी या कामाच्या ठिकाणी अपघात झाला होता. एका मजुराच्या अंगावर गरम डांबर नेणारा ट्रक उलटला होता. त्यानंतरही या कामांना म्हणावा तसा वेग येताना दिसत नाही. रस्ते खोदल्यामुळे पर्यटक, भाविकांना चालणे रस्त्यावरून चालणेही मुश्कील झाले आहे. ही कामे लवकरात लवकर करावी, अशी मागणी होत आहे. मात्र, ते सोडून स्मार्ट सिटीच्या नावाखाली पंचवटी येथील ऐतिहासिक रामसेतू पेलू पाडण्याच्या हलचाली सुरू झाल्यात.
जनआंदोलन उभारणार
पंचवटीमधील नागरिकांना नाशिक गावात प्रवेश करण्यासाठी गोदावरी नदीवर हा ऐतिहासिक रामसेतू बांधण्यात आला आहे. या पुलावर अनेक जण छोटा-मोठा उद्योग करतात. हा पूल सुरक्षित आहे. नाशिककरांचे याच्याशी जिव्हाळ्याचे नाते आहे. मात्र, स्मार्ट सिटीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना ना नाशिकचा जुना इतिहास माहिती आहे, ना नाशिकरांचे कशावर प्रेम याची जाण आहे. त्यामुळे हा पूल पाडण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला आता विरोध होताना दिसत आहे. नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
वटवृक्षानंतर दुसरे प्रकरण
नाशिकमध्ये यापूर्वी उड्डाणपुलाच्या नावाखाली अडीचशे वर्षांपूर्वीचा वटवृक्षत तोडण्याचा घाट घालण्यात आला होता. उंटवाडीत हा वटवृक्ष आहे. याविरोधात नाशिककर रस्त्यावर आले. त्यामुळे स्वतः पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांंनी हा वटवृक्ष वाचवण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर आता ऐतिहासिक रामसेतूबाबत तसेच होताना दिसत आहे. याप्रकरणी सरकार लक्ष घालणार का, हे पाहावे लागेल.
इतर बातम्याः