रॅपर राज मुंगासेला कोणत्या नेत्याने केली मदत? थेट पोलिसांनाही दिला इशारा

रॅपर राज मुंगासे याला नुकताच अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. याबाबत त्याला संपूर्ण मदत केली जाईल असे त्याला मदत करणाऱ्या राज्यातील एका बड्या नेत्याने म्हंटलं आहे.

रॅपर राज मुंगासेला कोणत्या नेत्याने केली मदत? थेट पोलिसांनाही दिला इशारा
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 3:04 PM

नाशिक : शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले पण त्यानंतर ’50 खोके एकदम ओके’ ही चर्चा राज्यासह देशभरात झाली. त्याच पार्श्वभूमीवर एका मराठी रॅपरने एक रॅप सॉन्ग केले होते. छत्रपती संभाजीनगर येथील राज मुंगासे याने ‘चोर आले पन्नास खोके घेऊन’ असे एक रॅप केले होते. त्यावरून संपूर्ण राज्यात चर्चा झाली होती. सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात ते रॅप चर्चेचा विषय ठरत होते. त्या रॅपमध्ये अश्लील शब्दांचा वापर झाल्याचा आरोप करत अंबरनाथ येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी स्नेहल कांबळे यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर राज मुंगासे हा बेपत्ता झालेला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. आज त्याला नुकताच अटकपूर्व जामीन मिळाला आहे.

याच काळात रॅपर राज मुंगासे याला शिवसेना ठाकरे गटाचे नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मदत केली होती. त्यामध्ये राज मुंगासे याला जामीन झाल्यानंतर मुंबईवरुन छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने अंबादास दानवे यांनी त्याला आपल्या गाडीतून नेले आहे.

टीव्ही मराठीशी बोलत असतांना राज मुंगासे याला पोलिसांनी त्रास देऊ नये असा इशाराही अंबादास दानवे यांनी दिला आहे. यावेळी राज मुंगासे याने कुठलाही गुन्हा केलेला नाही. कुठतरी गुन्हा दाखल झाला म्हणून त्याच्यावर पोलिसांनी अन्याय करू नये असेही दानवे यांनी म्हंटलं आहे.

हे सुद्धा वाचा

राज मुंगासे याने गाणे केले आहे. त्यामध्ये असं काही चुकीचं नाही. पन्नास खोके तर आज महाराष्ट्रात कुणीही म्हणतं. तो काय गुन्हा झाला का. राज मुंगासे हा माझ्या जिल्ह्यातील आहे. म्हणून मी त्याला न्यायालयीन मदत केली आहे असेही अंबादास दानवे यांनी म्हंटलं आहे.

पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी प्रयत्न केले पण पोलिसांना माझे सांगणे आहे. त्यांनी कुठलाही गुन्हा केलेला नाही. त्यामुळे त्याला त्रास देऊ नका. युवकांवर आणि कलाकारांवर गुन्हा दाखल करू नका त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोपही अंबादास दानवे यांनी केला आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी स्नेहल कांबळे यांनी राज मुंगासे याच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यावरून अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत होते. राज मुंगासे याला नुकताच अटकपूर्व जामीन मिळाला असून राज सोबतचा फोटोही शेयर केला आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.