ठाकरे गटाचे आमदार आणि छगन भुजबळ यांच्यात जुंपली, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं, कोण काय म्हणालं?

बाजार समितीच्या निवडणुकीवरून ठाकरे गटाचे आमदार नरेंद्र दराडे आणि छगन भुजबळ यांच्यात जुंपली आहे. निमित्त बाजार समितीचे असले तरी जुनं राजकारण चर्चेचा विषय ठरत आहे.

ठाकरे गटाचे आमदार आणि छगन भुजबळ यांच्यात जुंपली, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं, कोण काय म्हणालं?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 5:32 PM

नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नरेंद्र दराडे यांच्यात बाजार समितीच्या निवडणुकीतील प्रचारावर चांगलीच जुंपली आहे. छगन भुजबळ यांनी येवला येथे बाजार समितीचा प्रचार करत असतांना दराडे बंधु यांनी माझ्या विरोधात विधानसभेला उभे राहून दाखवावे असे आव्हान केले होते. त्याच दरम्यान आमदार दराडे यांनी यांनी नाशिक जिल्हा बँकेत भ्रष्टाचार केला म्हणून बँक बुडाली असा आरोप केला होता. त्यावरून आमदार नरेंद्र दराडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांनी केलेले आरोप फेटाळून लावत छगन भुजबळ यांच्याच मुले जिल्हा बँक बुडल्याची टीका केली आहे. याशिवाय पुढील काळात येवल्यात कोणतीही निवडणूक असली तर महाविकास आघाडी होणार की नाही यावर भाष्य केले आहे.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक ही छगन भुजबळांमुळेच बुडाली असल्याचा घाणाघाती आरोप ठाकरे गटाचे आमदार नरेंद्र दराडे यांनी केला आहे. भुजबळ यांनी आर्मस्ट्रॉंग कंपनी करता जिल्हा बँकेतून घेतलेले कर्ज देखील फेडले नसल्याचा आरोप आमदार नरेंद्र दराडे यांनी करत भुजबळांच्या आरोपाला जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराकरता येवल्यात आले होते. त्या दरम्यान भुजबळ यांनी ठाकरे गटाचे आमदार दराडे बंधूंना खुलेआम विधानसभेचा उभे राहण्याचे आवाहन केले होते तसेच जिल्हा बँक दराडे मुळेच बुडाली असा आरोप भुजबळांनी केला होता.

हे सुद्धा वाचा

संपूर्ण महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडी असली तरी देखील भुजबळ यांनी स्वतःच्या स्वार्थाकर्ता महाविकास आघाडीचा फायदा घेतला असून येवल्यात कोणत्याही निवडणुकीकरता महाविकास आघाडी होणार नसल्याने शिवसेना ही स्वतः स्वबळावर पुढील निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

खरंतर सध्या बाजार समितीच्या निवडणुका सुरू आहे. त्याची लगबग सर्वत्र सुरू असतांना येवल्यात भुजबळ यांनाच ठाकरे गटाचे आमदार यांनी पॅनल बनवून आव्हान दिले आहे. त्यामध्ये छगन भुजबळ यांनी प्रचारादरम्यान जुनं राजकारण उकरून काढत आमदार दराडे यांच्यावर निशाणा साधला होता.

त्यावरून आमदार नरेंद्र दराडे यांनी छगन भुजबळ यांनी केलेले आरोप फेटाळून लावत भुजबळांवर पलटवार केला आहे. त्यामध्ये दराडे यांनी आगामी काळात कोणत्याही निवडणुकीत येवल्यात महाविकास आघाडी नसेल असे जाहीर करून टाकले आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

Non Stop LIVE Update
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.