आमदाराने धमकीचा आरोप केलेल्या पिता-पुत्राचं म्हणणं काय? धमकीचा संबंधच येत नाही म्हणत…
आमदार हिरामण खोसकर यांनी केलेल्या आरोपवर चुंभळे पितापुत्र यांनी आरोप फेटाळत सांगितला इतिहास, आमदार खोसकर यांच्यावर टीकाही केली.
नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून राजकीय नेत्यांना धमकी आल्याचे समोर येत असतांना आमदार हिरामण खोसकर यांनी मला फोनवरुन धमकी दिल्याचा आरोप केला होता. हिरामण खोसकर हे कॉंग्रेसचे आमदार असून इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदार संघातून निवडून आले आहे. हिरामण खोसकर यांना बाजार समितीत विरोधात प्रचार केला म्हणून विरोधी गटात असलेल्या शिवाजी चुंभळे आणि त्याचे पुत्र अजिंक्य चुंभळे यांनी फोन करून धमकी दिल्याचा आरोप केला होता. त्यावेळी बोलत असतांना पिंगळे यांच्या व्यासपीठावर जाऊ नका म्हणत धमकी दिली होती. त्यावर हिरामण खोसकर यांनी यांच्याकडून मारण्यापेक्षा आत्महत्या करेल असेही म्हंटले होते. त्या दरम्यान हिरामण खोसकर यांना अश्रुही अनावर झाले होते.
आमदार हिरामण खोसकर यांनी केलेल्या आरोपावर शिवाजी चुंभळे आणि अजिंक्य चुंभळे यांनी केलेल्या आरोपावर भाष्य केले आहे. आमदार हिरामण खोसकर यांनी केलेल आरोप फेटाळून लावत आमदार खोटं बोलत असल्याचा आरोप केला आहे.
शिवाजी चुंभळे म्हणाले, धमकीचा संबंधच येत नाही, आम्ही तुम्हाला मोबाईल रेकॉर्डिंग ऐकवली, कुठे धमकी दिली? कुठे शिवीगाळ केली? आमदार हिरामण खोसकर खोट बोलत आहेत असा आरोपही करत खोसकर यांना आमदारकीच्या वेळी मदत केली होती, त्यापूर्वी जिल्हा परिषदेला मदत केली होती.
तर अजिंक्य चुंबळे म्हणाले, आमदार एखाद्या कलाकारा पेक्षा चांगले नट आहेत, आम्ही त्यांना आमदारकीच्या वेळी मदत केली होती. त्या बदल्यात मदत करा एवढंच बोललो. धमकी दिली असेल तर पुरावे द्यावेत, आमदारांच्या पाया खालची वाळू सरकली असल्याने आमच्या बद्दल बदनामी सुरू केली आहे असेही चुंभळे यांनी म्हंटलं आहे.
आमदार हिरामण खोसकर यांना यापूर्वीच्या निवडणुकीत मदत केल्याचा दावा करत चुंभळे यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, याबाबत हिरामण खोसकर यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुण अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. बाजार समितीच्या निवडणुकीवरून हे आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे.
हिरामन खोसकर यांनी वरुन आदेश आल्याने महाविकास आघाडीचे काम करीत असल्याचे म्हंटले आहे. त्यानुसार माजी खासदार देविदास पिंगळे यांचे काम करीत असल्याचे खोसकर यांनी सांगत चुंभळे यांच्यावर आरोप केल आहे. प्रकरण पोलिस ठाण्यात गेले असले तरी या आरोपांची पोलिस काय दखल घेऊन कारवाई करतात हे पाहणं महत्वाचे असले तरी बाजार समितीच्या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरत आहे.