Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपमहापौरांसह भाजपचे 4 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला; नाशिकमध्ये फोडाफोडीला वेग!

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये येऊन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. मुंबई महापालिकेच्या कारभारावरून जोरदार टीका केली. या आरोपाला शिवसेनेने हे राजकीय उत्तर दिल्याचे बोलले जात आहे. येणाऱ्या काळात नगरसेवकांच्या फोडाफोडीला पुन्हा वेग येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उपमहापौरांसह भाजपचे 4 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला; नाशिकमध्ये फोडाफोडीला वेग!
Shiv Sena
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 6:39 PM

नाशिकः महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये (Nashik) पुन्हा एकदा फोडाफोडीला वेग आला असून, भारतीय जनता पक्षाचे (BJP) 4 नगरसेवक शिवसेनेच्या (Shiv Sena) गळाला लागल्याचे समजते. मुंबईत आज मातोश्रीवर हे नगरसेवक शिवबंधनात अडकणार आहेत. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये येऊन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. मुंबई महापालिकेच्या कारभारावरून जोरदार टीका केली. या आरोपाला शिवसेनेने हे राजकीय उत्तर दिल्याचे बोलले जात आहे. येणाऱ्या काळात नगरसेवकांच्या फोडाफोडीला पुन्हा वेग येण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच पक्षाच्या बड्या नेत्यांनी लक्ष घातले आहे.

कोण बांधणार शिवबंधन?

शिवसेनेने सुनील बागुल यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी टाकलीय. त्यांच्याच खांद्यावर महापालिका निवडणुकीची धुरा येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांच्या मातोश्री आणि पुत्र हे सध्या भाजपमध्ये आहेत. बागुल यांच्या मातोश्री भिकुबाई बागुल या उपमहापौर आणि पुत्र मनीष हे भाजयुमोचे शहराध्यक्ष आहेत. हे दोघेही आता शिवसेनेमध्ये येणार असल्याची चर्चा आहे.

गिते यांचे पुत्र…

वसंत गिते सध्या शिवसेनेत आहेत. मात्र, त्यांचे पुत्र आणि माजी उपमहापौर प्रथमेश गिते हे भाजपचे नगरसेवक आहेत. ते सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दुसरीकडे सातपूरमध्ये भाजपच्या तिकिटावर यापूर्वी निवडून आलेली एक नगरसेविका शिवबंधन बांधणार असल्याचे समजते. शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब यांनी ही राजकीय सूत्रे हलवले असून, निवडणुकीच्या तोंडावर याचा भाजपला चांगलाच फटका बसणार आहे.

निवडणूक कधी होणार?

सध्या नाशिक महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर आलेल्या हरकतींची सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यावर शिफारस अहवाल 2 मार्चपर्यंत राज्य निवडणूक आयोगाला सादर केला जाईल. त्यानंतर 10 मार्चपर्यंत अंतिम प्रभाग रचना आराखडा जाहीर करण्यात येणार आहे. त्यात ओबीसी आरक्षणाबाबत काही निर्णय झाला, तर पुन्हा प्रवर्ग निहाय आरक्षण, स्त्री-पुरुष वर्गवारी प्रसिद्ध केली जाईल. त्यावरही हरकती मागवण्यात येतील. त्यावर पुन्हा सुनावणी होईल. पालिकेची मुदत येत्या 15 मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे निवडणुका कधी होणार याची उत्सुकता आहे.

इतर बातम्याः

Birth Anniversary | पोरकी लेक, प्रसिद्ध अभिनेत्री, 5 वेळा मुख्यमंत्री; जयललितांचा रोमहर्षक प्रवास…!

महापालिकेत घराणेशाहीचा झेंडा; नाशिकमध्ये नेत्यांच्या एका-एका घरातून तिघा-तिघांना हवे तिकीट!

नाशिकमध्ये 7 नगरपरिषदांच्या निवडणुका; प्रभाग रचना 5 एप्रिलला होणार प्रसिद्ध, कसा आहे कार्यक्रम?

अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला.
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा.
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला.
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी.