महानगर पालिकेचा मोठा निर्णय! घनकचरा व्यवस्थापन करत असतांना इंधनही तयार, पाहा कसे?

नाशिक महानगर पालिकेच्या माध्यमातून पुन्हा एक नवा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. घनकचरा व्यवस्थापन करत असताना इंधन तयार केले जाणार आहे.

महानगर पालिकेचा मोठा निर्णय! घनकचरा व्यवस्थापन करत असतांना इंधनही तयार, पाहा कसे?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 7:01 PM

नाशिक : अलीकडील काळात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्थानिक प्रशासनाला मोठी कसरत करावी लागते. त्यासाठी विविध प्रयोग केले जात असतात. याच पार्श्वभूमीवर शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यावर जास्तीत जास्त कार्यक्षमतेने प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने कचरा वर्गीकरण करणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्याकरिता नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पात सद्यस्थितीत ट्रोमेल द्वारे वर्गीकरण करण्यात येते. परंतु येणाऱ्या कचऱ्याचे आणखी चांगल्या पद्धतीने वर्गीकरण करण्यासाठी 250 मेट्रीक टन प्रतिदिन क्षमतेचा नवीन बॅलेस्टिक सेपरेटर संच उभारण्यात आला आहे.

सुक्या कचऱ्याचे तीन ते चार प्रकारात योग्य प्रकारे वर्गीकरण होते. त्यापासून उच्च प्रतीचे आरडीएफ तयार करणे शक्य होणार आहे. तसेच दैनंदिन कचऱ्यात प्लास्टिकचे प्रमाण बघता त्यातील चांगल्या प्रतीच्या प्लास्टिकपासून इंधन तयार करता येणार आहे.

त्याच पार्श्वभूमीवर पाच लिटर प्रतिदिन क्षमतेच्या ‘प्लास्टिक टू फ्युएल’ या संयत्राची उभारणी करण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत हे दोन्ही संयंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

या दोन्ही प्रकल्पामुले शहरातील दैनंदिन कचऱ्यावर आणखी चांगल्या पद्धतीने प्रक्रिया करणे आणि विल्हेवाट लावली जाणार आहे. खरंतर नाशिक महानगरपालिकेने 2001 पासून घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरिता प्रक्रिया केंद्र उभारले आहे.

त्यामध्ये ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचा 300 मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचा प्लान्ट उभा आहे. त्यानंतर 2009 मध्ये त्यात वाढ करून प्रकल्पाची क्षमता पाचशे मेट्रीक टन प्रतिदिन इतकी वाढवण्यात आली. या केंद्रामध्ये जळाऊ कचऱ्यापासून आरडीएफ तयार करण्याच्या प्रकल्पाचाही समावेश करण्यात आला आहे.

हाच महानगर पालिकेचा प्रकल्प नंतरच्या काळात खाजगी एजन्सीला देण्यात आला आहे. महानगर पालिकेने ही राबवत असतांना ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती, सुक्या कचऱ्यापासून आरडीएफ निर्मिती केली जात आहे.

याशिवाय गार्डन वेस्ट आणि पालापाचोळ्यापासून ब्रिकेट तयार करणे, प्लास्टिक पासून प्लास्टिक दाणे तयार करणे, कचऱ्यातील लीचेटवर प्रक्रिया करणे, मृत जनावरे शवदाहीनी, सायंटिफिक लँडफील, जुन्या लँडफीलचे सायंटिफिक कॅपिंगचा समावेश करण्यात आला आहे.

एकूणच शहराची सर्वात समस्या दूर करण्यासाठी पालिकेकडून वेळोवेळी नवं पाऊल टाकलं जात आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छता देखील होत आहे. घनकचरा व्यवस्थापन देखील केले जात आहे. त्यामुळे शहरातील कचऱ्याची समस्या कायमस्वरूपी मिटवण्यासाठी आणि त्यानंतर होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकल्याने नागरिकांना एक प्रकारे हा दिलासा मिळणार आहे.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.