शिस्त मोडता कामा नये, पण संवेदना हरवूनही चालणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षकांना कानमंत्र

Devendra Fadnavis on Police Force : पद, पैसा हे ध्येय असू शकत नाही, कोणाच्या जीवनात परिवर्तन करणं हेच सर्वात मोठं मेडल!; देवेंद्र फडणवीस यांचं नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील दीक्षांत समारंभात भाष्य

शिस्त मोडता कामा नये, पण संवेदना हरवूनही चालणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षकांना कानमंत्र
उपुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसImage Credit source: Devendra Fadnavis FB
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 10:00 AM

नाशिक | 05 ऑगस्ट 2023 : राज्याचे उपुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात  122 व्या दीक्षांत सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस उपनिरीक्षकांना प्रशिक्षण दिलं जातं. 122 व्या तुकडीत 494 पोलीस उपनिरीक्षकांना प्रशिक्षण दिलं गेलं आहे. आजच्या या दीक्षांत सोहळ्याच्या कार्यक्रमानंतर हे सर्व पोलीस उपनिरीक्षक राज्य पोलीस दलात सामील झाले आहेत. पालकमंत्री दादा भुसे देखील यावेळी उपस्थित होते.

नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील दीक्षांत सोहळ्याच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं. पोलीस दलात दाखल होणाऱ्या सर्व पोलीस उपनिरीक्षकांचे मनपूर्वक अभिनंदन करतो, असं म्हणत फडणवीस यांनी भाषणाला सुरुवात केली.

महाराष्ट्राचं पोलीस दल हे देशातील सर्वात मोठं आणि शिस्तबद्ध दल आहे. या दलात येताना आनंद आहे, मात्र जबाबदारीची जाणीव देखील हवी. शिस्त मोडणे आपल्याकडून घडणार नाही याची काळजी घ्यावी. पण शिस्तीत संवेदना हरवून चालणार नाही. आपल्याकडे येणारे बहुतांश लोक दुखावलेले, अडचणीत असतात. आशा वेळी आपली संवेदना आकश्यक आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ही संवेदना आपण कधीही मोडणार नाही. आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करावे लागते. समाजात गुणवत्तपुर्वक सुधारणा करण्याची संधी असलेली ड्युटी आपण करणार आहोत. पद, पैसा हे ध्येय असू शकत नाही. अनेक पोलीस अधिकारी 1-2 वर्ष गावात राहतात, मात्र लोकांच्या हे काम कायम समरणात राहतं. कोणाच्या जीवनात परिवर्तन करणं हे सर्वात मोठं मेडल असतं, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.

अनेकदा आमचे ट्रेनी अधिकारी देखील प्रलोभनांना बळी पडतात. घेतलेली शपथ निभावण्याचा प्रयत्न करायचा आहे. कोणी कितीही मोठा असला तरी चुकीला माफी नाही ही आपल्याला छत्रपतींनी दिलेली शिकवण आहे. येत्या काळात स्ट्रीट क्राईम सोबत सायबर क्राईमचं मोठं आव्हान आपल्यासमोर असणार आहे. येता काळ आव्हानांचा आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण सज्ज आहात. ही आव्हानं आपण चांगल्या पद्धतीने पेलाल अशी आशा आहे, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

देवेंद्र फडवणीस काल संध्याकाळी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. शासकीय विश्रामगृहात त्यांनी काल रात्री मुक्काम केला. आज या दीक्षांत समारंभाला हजेरी लावली अन् आता थोड्याच वेळात ते नागपूरसाठी रवाना होतील.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.