भय इथले संपत नाही, तो येतो आणि हल्ला करून जातो, नागरिकांबरोबरच जनावरांच्यामध्येही भीतीचं वातावरण

आधीच अस्मानी संकट आणि सुलतानी संकटाने शेतकरी हवालदिल झालेला असतांना नवं संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहत आहे. तर या संकटामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भय इथले संपत नाही, तो येतो आणि हल्ला करून जातो, नागरिकांबरोबरच जनावरांच्यामध्येही भीतीचं वातावरण
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 13, 2023 | 10:00 AM

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बिबट्याची दहशत ( Leopard Attacked ) काही केल्या कमी होतांना दिसून येत नाहीये. जिल्ह्यात दर दिवसाला कुठल्या ना कुठल्या भागात बिबट्याचा हल्ला दिसून येत आहे. नुकताच नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे ( Pimplas Ramache ) गावात बिबट्याने पंधरा दिवसाच्या आतमध्ये दुसरी हल्ल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पिंपळस रामाचे गावासह पंचक्रोशीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांबरोबरच पशूधनावरही हल्ले होऊ लागल्याने पशूधन धोक्यात आले आहे. हल्याच्या घटनेने जनावरांमध्ये थरकाप भरला आहे. रात्री-पहाटेच्या वेळेला हे हल्ले होत असल्याने वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहे.

नाशिकच्या निफाड तालुक्यातील गावांमध्ये बिबट्याचा मोठा वावर आहे. बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने तालुक्यातील शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामध्ये आता पशूपालन देखील संकटात सापडत आहे. वारंवार बिबट्याच्या हल्ल्यात पशुधन ठार होत आहे.

पंधरा दिवसांपूर्वी पिंपळस रामाचे येथील शेतकरी रामदास साहेबराव सुरुवाडे यांच्या घराशेजारी असलेल्या वासरीला ठार केले आहे. याबाबतचा पंचनामा होऊ दिलासा मिळत नाही तोच गावातील सुरवाडे वस्ती येथील सुनील दौलत सुरुवाडे यांच्या घराशेजारील गोठ्यातील वासरीवर हल्ला केला आहे.

हे सुद्धा वाचा

सोमवारी पहाटे झालेल्या या हल्ल्यात वासरी ठार झाली आहे. गावाच्या लगत असलेल्या सुरवाडे वस्तीवर बिबट्याने वासरीला ठार केल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. यापूर्वी नाशिकच्या ओझर येथेही एका गोठ्यात बिबट्याने प्रवेश करून वासरीला फस्त केले होते.

एकूणच बिबट्यांकडून आता पशुधन लक्ष केले जात असून वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे. शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून जनावरे पाळली जातात. मात्र, बिबट्याच्या हल्ल्याने तो देखील धोक्यात आला आहे.

शेतकऱ्यांकडून वारंवार पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात असतांना सुस्तावलेले वन विभागाचे अधिकारी याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. वेळीच याकडे वन विभागाने लक्ष दिले नाहीतर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे.

आधीच शेतकरी अस्मानी संकट आणि सुलतानी संकट अशा दुहेरी संकटाचा सामना करत असतांना आता बिबट्याचे तिसरे संकट ओढवलेले आहे. अधिकच आर्थिक संकट कोसळलेले असतांना आता पुन्हा बिबट्यानेही आर्थिक संकट शेतकऱ्यांच्या समोर निर्माण केले आहे.

एकंदरीत अशीच काहीशी स्थिती नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात आहे. वारंवार वणविभाग दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत असल्याने हल्ल्याच्या घटना घडत आहे. अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला असतांना बिबट्याने आणखी खळबळ उडवून दिल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

निफाड तालुक्यात जंगल परिसर आणि नदी असल्याने बिबट्याने जवळपास मुक्कामच या परिसरात ठोकला आहे. त्यामुळे बिबट्याचा सामना नाशिक जिल्ह्यातील नागरिकांसाठीच नित्याचाच झाला आहे. त्यामुळे पुढील काळात वनविभाग काही ठोस पाऊले उचलतात का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.