निवडणूक बाजार समितीची पण रंगीततालिम लोकसभेची, इच्छुकांच्या हालचाली वाढल्या, आजी-माजी खासदार आमनेसामने?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होऊ घातलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीची रंगीत तालिम पाहायला मिळणार आहे. यामध्ये दुसरी महत्वाची बाब म्हणजे आजी माजी खासदार सामने येणार असल्याचे चित्र आहे.

निवडणूक बाजार समितीची पण रंगीततालिम लोकसभेची, इच्छुकांच्या हालचाली वाढल्या, आजी-माजी खासदार आमनेसामने?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 12:10 PM

नाशिक : राज्यात सध्या बाजार समित्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सगळीकडे बाजारसमितीच्या निवडणुकीचं वातावरण आहे. त्यात सध्या नाशिक बाजार समितीच्या निवडमणुकीत कोण कोणत्या पक्षाबरोबर राहणार याबबात चर्चा सुरू असतांना आता एक नवीन चित्र पाहायला मिळाले आहे. नुकतीच भाजप आणि शिवसेनेची बैठक पार पडली त्यामध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी नेतृत्व करावे अशी मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे माजी खासदार देविदास पिंगळे यांचीही यामध्ये जोरदार तयारी सुरू आहे. खरंतर नाशिकच्या बाजार समितीत चुंबळे आणि पिंगळे असा सत्तासंघर्ष गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे.

बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे आणि माजी खासदार तथा माजी सभापती देविदास पिंगळे यांच्यात बाजार समितीवर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न राहिला आहे. कधी पिंगळे तर कधी चुंबळे अशीच सत्ताचक्र राहिले आहे.

मात्र, गेल्या काही महिन्यांपासून बाजार समिती प्रशासक होते. त्यामध्ये आता भाजप आणि शिवसेनेच्या माध्यमातून हेमंत गोडसे यांनी यांनी नेतृत्व करावे असे बोलले जात आहे. तर दुसरीकडे देविदास पिंगळे हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून नेतृत्व करीत असल्याची स्थिती आहे.

हे सुद्धा वाचा

निवडणुकीचे बिगुल वाजले असले तरी अद्याप मात्र उमेदवार निश्चित झालेले नाही. त्यासाठी केला जाणारा पॅनलही अद्याप घोषित झालेला नाही. त्यामुळे बैठकांचे सत्र जोरदार सुरू असून उमेदवार निश्चितीबाबत खलबत केली जात आहे.

नाशिक बाजार समिती तशी सहा आमदारांच्या कार्यक्षत्रात आहे. मोठा परिसर नाशिक बाजार समितीत येतो. त्यामध्ये बाजार समितीतून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आयात निर्यात होते. त्यामुळे बाजार समितीत सत्ता मिळावी याकरिता मोठ्या प्रमाणात ताकद लावली जाते.

नाशिक बाजार समितीची मोठी उलाढाल आहे. कांदा, डाळिंब, टोमॅटो यांच्यासह भाजीपाला आणि फळभाज्या घेऊन शेतकरी मोठ्या प्रमाणात येत असतात. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बाजार समितीत निवडून येण्यासाठी मोठा कस लागतो. त्यासाठी राजकीय पक्षांची मोठी ताकद यावेळेला पाहायला मिळत असते.

त्यात आता हेमंत गोडसे देखील बाजार समितीच्या निवडणुकीचे नेतृत्व करण्याच्या तयारीत आहे. तशी गळही त्यांना घातली जात आहे. त्यामुळे आजी माजी खासदार यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे यामध्ये कोण वरचढ ठरणार याकडे लक्ष लागून आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक म्हणजे लोकसभा निवडणुकीची रंगीततालिम असणार आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊनच बाजार समितीची लढत पाहायला मिळणार आहे.

'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.