कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हालचाली वाढल्या, नमामि गोदा प्रकल्पाच्या माध्यमातून होणार मोठे बदल, जाणून घ्या

वाराणसीच्या धर्तीवर नाशिकमध्येही नमामि गोदा प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महानगर पालिकेने कंबर कसली आहे.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हालचाली वाढल्या, नमामि गोदा प्रकल्पाच्या माध्यमातून होणार मोठे बदल, जाणून घ्या
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 4:57 PM

नाशिक : दर बारा वर्षांनी कुंभमेळा नाशिकमध्ये होत असतो. त्यानिमित्ताने दक्षिन गंगा म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदी स्वच्छ करण्यासाठी नमामि गोदा हा प्रकल्प जाहीर करण्यात आला होता. त्यासाठी केंद्रासह राज्य सरकार आर्थिक हातभार लावणार आहे. गोदावरी नदी स्वच्छ करण्यासाठी या प्रकल्पा मोठा वाटा असणार आहे. ज्यामध्ये गोदावरी नदीत जाणारे दूषित पाणी रोखले जाणार आहे. वाराणसी येथील गंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी राबविण्यात आलेला प्रकल्प नाशिक येथे राबविला जाणार आहे. त्याच धर्तीवर गोदावरी प्रदूषण मुक्त करण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. याबाबतचा अहवाल तयार करण्यासाठी पालिकेने कंबर कसली असून ऑगस्ट महिन्याच्या अखेर पर्यन्त हा प्रकल्प राबविण्यात आला आहे.

सिंहस्थ कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी आणि तिला जोडेलल्या उपनद्या प्रदूषण मुक्त करण्यावर भर दिला जात आहे. नमामि गोदा योजनेचा प्रकल्प अहवाल ऑगस्ट महिन्या अखेर सादर केला जाणार आहे.

नाशिक महानगर पालिकेचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके हे याबाबत आढावा घेत आहे. यामध्ये शहरातील मलवाहिकांची क्षमतावाढ आणि सुधारणा करून नदीत जाणारे मलवाहिका अडवून तिथे केंद्र उभारले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे नव्याने रहिवासी भाग तयार होत आहे तिथेही मलवाहिका निर्माण केल्या जाणार आहे. यामध्ये नाशिक शहरात दोन ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारले जाणार आहे. त्यात मखमलाबाड आणि कामटवाडे येथे होण्याची शक्यता आहे.

नमामि गोदा म्हणजे घाट परिसराचे सुशोभीकरणही केले जाणार आहे. जुन्या घाटांचे संवर्धन करत असतांना नव्या घाटाची निर्मितीही केली जाणार आहे. यामध्ये दूषित पाणी प्रक्रियाकरून नदीत सोडण्याची प्रक्रियेवर भर दिला जाणार आहे.

रामकुंड परिसरात येणारे पाणी स्वच्छ कसे येईल आणि ते कसे स्वच्छ राहील यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प कसा पूर्ण करता येईल यासाठीचे प्रयत्न सुरू असून सल्लागार नेमण्यात आले आहे. हा प्रकल्प आगामी काळात पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार निधी उपलब्ध करून देणार आहे.

हा प्रकल्प करत असतांना नाशिक महानगर पालिकेच्या माध्यमातून पूर्ण केला जाणार आहे. त्यामध्ये नाशिक महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अहवाल तयार करण्यासाठी यंत्रणा राबवत कंबर कसली असून आगामी काळातील सिंहस्थ कुंभमेळा कसा उत्तम होईल यासाठी प्रयत्न केले जात आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.