नाशिकमध्ये आता टोइंग बंद, नाशिक पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय; पण कारवाई होणार ‘ती’ कशी? जाणून घ्या
नाशिकच्या पोलिस आयुक्तांनी घेतलेल्या एका निर्णयाने नाशिककरांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
नाशिक : नाशिक शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिककरांना मोठा दिलासा दिला आहे. शहरांमध्ये रस्त्यावर नो पार्किंगमध्ये आणि वाहतुकीला अडथळा होईल अशा ठिकाणी लावलेली वाहने टोइंगकरून नेली जात होती. त्यासाठीचा ठेका नाशिक शहरात देण्यात आला होता. पोलिस आयुक्तांनी तो ठेका रड करून नाशिककरांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र, दुसरीकडे बेशिस्त पद्धतीने वाहन पार्किंग केली जाईल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दरम्यान टोइंगच्या माध्यमातून नाशिककरांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेकदा पार्किंग मधील वाहने देखील उचलून नेली जात होती. त्यामुळे मोठा दिलासा नागरिकांना मिळाला आहे.
नाशिक शहरात टोइंगच्या माध्यमातून वाहने उचलून नेल्यावर मोठा मनस्ताप नाशिककरांना करावा लागत होता. शहरातील कोणत्याही ठिकाणाहून वाहन उचलून नेल्यास शरणपुर रोड येथे जाऊ दंड भरून ते वाहन मिळत होते.
याशिवाय अनेकदा वाहन टोइंग केल्यावर जागेवर नागरिक मागणी करत होते, पण त्यांना जागेवर वाहन न देता शरणपुर रोड येथे या म्हणून सल्ला दिला जायचा, नियमांचे पालन न करता अनेकदा वाहनं उचलून नेली आहे.
टोइंग आणि नागरिक यांच्यात नेहमीच वाद होत होते. त्यामुळे नागरिकांनी पोलिस आयुक्त कार्यालयात मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या होत्या. त्यावरून पोलिसांनाही रोषाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे टोइंग सुरुवातीपासूनच वादात राहिली आहे.
त्यातच आता टोइंगच्या कंत्राटाला वाढीव मुदत देण्यात आलेला आदेश रद्द करण्यात आल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु बेशिस्त पार्किंग केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कारवाईत सुटका नसणार आहे.
पण जो त्रास टोइंगमुळे होत होता तो आता होणार नाहीये, त्यामुळे एकप्रकारे टोइंगच्या कार्यालयात जाऊन वाहने घ्यावी लागत होती. त्यामुळे मोठी अडचण दूर होणार आहे. मात्र, आता पुढील काळात कोणती यंत्रणा असणार आहे याकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही टोइंग कायमस्वरूपी बंद करावी अशी मागणी नाशिकमधील अनेक नागरिकांनी केली होती. अनेक पक्षांनी आंदोलने देखील केली होती. टोइंगच्या माध्यमातून नागरिकांची लूट केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता. मात्र आता यातून मुक्तता होणार असली तरी नागरिकांनी बेशिस्त पार्किंग करू नये अन्यथा आर्थिक कारवाईला सामोरे जावे लागेल.