माणसंचं काय पशू-पक्षांना बसतोय फटका, सूर्य आग ओकतोय पक्षी कासावीस होऊन जीव सोडताय, पोल्ट्री व्यावसायिक धास्तावले

शेतकरी शेती करत असताना कुक्कुटपालन म्हणून जोडधंदा करत असतो. तर काही जण फक्त कुक्कुटपालन हाच व्यवसाय करतात. सध्या हाच व्यवसाय अडचणीत सापडला आहे.

माणसंचं काय पशू-पक्षांना बसतोय फटका, सूर्य आग ओकतोय पक्षी कासावीस होऊन जीव सोडताय, पोल्ट्री व्यावसायिक धास्तावले
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 1:19 PM

नाशिक : गेल्या आठवडाभरापासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. दिवसा प्रचंड ऊन आणि सायंकाळी काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. वाढत्या तापमानाचा पारा वाढल्याने माणसांचा जीव कासावीस होत आहे. उष्माघाताने मृत्यू होत आहे. असे असतांना माणसं व्यक्त होऊ शकतात. ते बोलू शकतात. पण पशू पक्षी व्यक्त होऊ शकत नाही. त्यांच्या भावना कळण्यास उशीर होऊ शकतो, त्यामुळे त्यांचा मृत्यू देखील होतात. अशीच काहीशी परिस्थिती उद्भवली आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन करणारे म्हणजेच पोल्ट्री व्यावसायिक धास्तावले आहे. उष्णतेचे प्रमाण आल्याने पक्षांची मरतूक होण्याचे प्रमाण अचानक वाढले आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत सापडण्याची शक्यता अधिक आहे.

शेतकरी शेती करत असताना कुक्कुटपालन म्हणून जोडधंदा करत असतो. तर त्यात दुसरी महत्वाची बाब म्हणजे काही जण फक्त कुक्कुटपालन हाच व्यवसाय करतात. सध्या हाच व्यवसाय अडचणीत सापडला आहे. उष्णता वाढल्याने व्यावसायिक धास्तावले आहे.

खरंतर हवामानात बदल झाल्याने मागील आठवड्यातच कोंबड्यांचा जीव कासावीस होत होता. काही ठिकाणी तर गारपीट आणि वादळी वाऱ्याने कुक्कुटपालन व्यवसायच उद्ध्वस्त झाला होता. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

हे सुद्धा वाचा

त्यातून सावरत नाही तोच सूर्य आग ओकू लागला आहे. पारा चाळीशी पार गेला आहे. मोठ्या प्रमाणात उष्णता वाढल्याने पक्षांना उष्माघात होऊन मरतूक वधू लागली आहे. सिन्नर, निफाड, नाशिक, चांदवड, देवळा, येवला आणि इगरपुतीसह त्र्यंबकेश्वर तालुक्यात उष्माघाताचा फटका जाणवू लागला आहे.

उन्हाची काहिली वाढू लागली की सर्वाधिक फटका हा पशू पक्षांना बसतो. मात्र, ते व्यक्त होऊ शकत नाही, त्यामुळे मरतूक दिसून येत आहे. याशिवाय जनावरांना देखील याचा फटका बसतो आहे. उष्णता वाढल्याने दूधाचं प्रमाण घटलं आहे.

उष्णता जशी वाढते तशी शरीरातील पाण्याची संख्या कमी होते. त्यात गाई, म्हशी या जर दूध देत असेल तर त्यांना याचा फटका बसत असतो. उष्णतेमुळे पाणी कमी होते, त्याचा परिणाम थेट दुधावर होतो. त्यामुळे उष्णतेची लाट आल्याने नागरिकांना जसा त्रास होत आहे तसे पशू पक्षांना होत आहे.

याशिवाय इतर पशू पक्षांना पाणी ठेवण्याची गरज आहे. घराच्या बाहेर, अंगणात, टेरेसवर जिथं कुठं शक्य होईल तिथे पशू पक्षांना पाणी पिण्याची सोय करून ठेवावी. माणसं त्यांची सोय करू शकतात मात्र पशू पक्षांची जबाबदारी आपली असल्याचे समजून माणुसकी जपण्याचीही गरज यानिमित्ताने उपस्थित झाली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.