शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज ठाकरे मैदानात, मदतीसाठी थेट शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, कसं आहे नियोजन?

| Updated on: Apr 19, 2023 | 3:59 PM

उद्या सकाळी 11 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकच्या शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवस्थानी भेट घेणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा लागून आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज ठाकरे मैदानात, मदतीसाठी थेट शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, कसं आहे नियोजन?
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : हवामानात झालेल्या अचानक बदलामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान यामध्ये झालं आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं पीक संपूर्णतः भुईसपाट झाले आहे. कांदा, द्राक्ष, डाळिंब, गहू आणि भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेत लवकरच मदत जाहीर करू असे आश्वासन दिलं होतं. त्यानंतर शासन पातळीवरून पंचनामे देखील सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांना अद्यापही दिलासा मिळालेला नाहीये. त्यामुळे बळीराजाला मोठा फटका बसला असून मदतीच्या प्रतीक्षेत आहे. त्याचसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शेतकऱ्यांना मदत मिळून देण्यासाठी मैदानात उतरले आहे.

उद्या सकाळी 11 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकच्या शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवस्थानी भेट घेणार आहे. राज ठाकरे यांनी खरंतर हा पुढाकार घेतल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे उद्याच्या भेटीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

यावेळी नाशिकमधील काही निवडक पदाधिकारी शेतकऱ्यांच्या सोबत असणार आहे. त्यामध्ये राज ठाकरे हे शेतकऱ्यांच्या समस्या एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीचे गाऱ्हाणे मांडले जाणार आहे. त्यामुळे उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही घोषणा करतात का? याकडे लक्ष लागून आहे.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली होती. त्यामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे म्हंटले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिक दौरा झाल्यानंतर मुंबईमध्ये पोहचत नाही तोच पुन्हा अवकाळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीचा धडाका सुरूच होता. सलग आठवडाभर आलेल्या पाऊसाने आणि गारपिटीने शेतमाल पूर्णतः मातीत गेला आहे. काही ठिकाणी तर अक्षरशः बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे बघितले तर द्राक्षबागा भुईसपाट झाल्या आहेत. कांदा पूर्णतः भिजून गेला आहे. शेतातच कांदा सडून गेला आहे. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे भाजीपाला पूर्ण सडून गेला आहे. आंबा आणि डाळिंब पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मोठा फटका शेतकऱ्यांना बसला होता त्याच्या मदतीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला असून मदत काय होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.