सुट्टीच्या दिवशीही पालिकेतील ‘तो’ विभाग राहणार सुरू; नाशिक महानगर पालिकेचा फंडा काय? जाणून घ्या
नाशिक महानगर पालिकेचे सर्वात महत्वाचे उत्पन्नाचे साधन म्हणजे कर आहे. करातून मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या माध्यमातून नागरिकांना सेवा पुरविल्या जातात. मागील वर्षी रेकॉर्डब्रेक कर वसूली केली आहे.
नाशिक : नाशिक महानगर पालिकेचा काही दिवसांपूर्वी रेकॉर्डब्रेक कर वसूली केल्यानं महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांकाचे बक्षीस देऊन सन्मान केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा रेकॉर्डब्रेक कामगिरी करण्यासाठी नाशिक महानगर पालिकेच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. कर भरणा करत असतांना एप्रिलच्या महिण्यात कर भरल्यास सवलत देण्यात आली आहे. त्यात काही दिवस शिल्लक असतांना पालिकेला सुट्टी असणार आहे. मात्र तरी देखील कर भरणा केंद्र सुरू ठेवले जाणार आहे. त्यासाठी नागरिकांनी कर भरण्यासाठी दिलेल्या सवलतीचा फायदा घेणार आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत भर पडणार आहे. कर वसुलीचा विक्रम पाहता 125 टक्के कर वसूली महानगर पालिकेने मागील वर्षी केली होती.
नाशिक महानगर पालिकेचे सर्वात महत्वाचे उत्पन्नाचे साधन म्हणजे कर आहे. करातून मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या माध्यमातून नागरिकांना सेवा पुरविल्या जातात. मागील वर्षी केलेल्या रेकॉर्डब्रेक कर वसूलीमुळे नाशिक महानगर पालिकेचा राज्याच्या स्थरावर गौरव झाला होता.
हीच कामगिरी चालू वर्षात करण्यासाठी पालिकेने 1 एप्रिल पासूनच विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यामध्ये पालिकेच्या कर विभागाच्या वतीने सवलतीचा फंडा यंदाच्या वर्षीही लागू करण्यात आला आहे. त्यामुळे 35 कोटीहून अधिक रक्कम पहिल्या महिण्यात जमा होईल असा अंदाज पालिकेने बांधला आहे.
अनेकांनी ऑनलाइन रक्कम भरून पालिकेच्या कर सवलतीचा फायदा घेतला आहे. त्यामध्ये नाशिक महानगर पालिकेने 200 कोटीच्या घरपट्टी वसूलीसाठी एप्रिल महिण्यात कर भरल्यास 8 टक्के मालमत्ता करत आणि ऑनलाइन करिता सर्वसाधारण करत 5 टक्के सवलत दिली आहे. त्यासाठी आज आणि उद्याचा दिवस शिल्लक राहिला आहे.
दोन दिवसांत नागरिकांना फायदा घेता यावा यासाठी ही कर सवलतीची योजना चालू ठेवली आहे. पालिकेच्या सहाही विभागात कर भरणा केंद्र सुरू आहे. सुट्टीच्या दिवशी नागरिक कर भरू शकणार आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत आणखी भर पडणार आहे.
पालिकेने जवळपास 28 दिवसांत 45 कोटी रक्कम वसूल केली आहे. त्यात आणखी दोन दिवस शिल्लक आळसयाने त्यात भर पडणार आहे. अधिकारी आणि कर्मचारी यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामध्ये कर भरणा केंद्र सुरू ठेऊन नागरिकांना कर भरण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
नाशिक महानगर पालिकेचा इतिहास पाहता कर वसुलीचा विक्रम यापूर्वी कधीही झालेला नव्हता, यंदाच्या वर्षी झाल्याने पालिकेला मोठा हातभार लागला आहे. त्यात आता कर सवलतीचा फंडा आणि सुट्टीच्या दिवशी केंद्र सुरू ठेवल्याने आणखी कर वसूली होणार हे निश्चित आहे.