पालकांनो सावधान! मुलांच्या हातात वाहन द्याल तर याद राखा; RTO कडून कोणती कारवाई होणार?
पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या नियमांचे पालन करा अन्यथा तुमच्यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने अनेकांना रडारवर घेतलं जात आहे. त्याचं कारण म्हणजे वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्याचं अनेकदा निदर्शनास आलेले आहे. आणि त्याच दृष्टीने आता प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने नियमांचे पालन करण्यासाठी जनजागृती आणि त्यासोबतच कारवाई देखील केली जात आहे. नाशिकचे प्रादेशिक परिवहनाकडून आता कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. जनजागृती करूनही अनेक पालक आपल्या मुलांना वाहन देत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता थेट पालकांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे.
नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी प्रदीप अहिरे यांनी याबाबत शाळा, कॉलेज परिसरात जाऊन वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, तरीही अनेक पालक विद्यार्थ्यांना विना परवाना वाहनं देत आहे.
नाशिक शहरात विना परवाना अनेक मुलं वाहन चालवतांना आढळून आले आहे. यामध्ये आता मुलांच्या पालकांवर दंडाची आणि शिक्षा होईल अशी कारवाई केली जाणार आहे. यामध्ये थेट पालकांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे.
अनेक मुलं, मुली शाळेत क्लासला जाण्यासाठी दुचाकीचा वापर करतात. तर अनेक मुलांकडे वाहन परवाना नाही तरी देखील अनेक जण हे वाहन चालवतात. त्यामुळे जनजागृती करून देखील त्याचे पालन होत नसल्याने कठोर भूमिका घेण्यात येणार आहे.
ठिकठिकाणी प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने पथके तपासणी करणार आहे. त्यामध्ये एखादा मुलगा आढळून आल्यास त्याच्या पालकांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाने हा गंभीर इशारा अनेक मुलांना आणि त्यांच्या पालकांना दिला आहे.
अनेकदा मुलं घराच्या बाहेर पडतात, त्यांच्याकडून अपघात घडतात. अनेकांचा जीव जातो तर अनेकांना दुखापत होत असते. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे त्यांच्याकडून एखाद्याला धडक बसू शकते. त्यातून एखाद्याचा नाईक बळी जाऊ शकतो अशा विविध शक्यता आहे.
मुलांना शाळेत पाठवितांना सार्वजनिक वाहनाने प्रवास करण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. मात्र, पालक सुरक्षित प्रवास सोडून जीवाला धोका निर्माण होईल असे कृत्य करत असतात. त्यामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. यावरून आता आरटीओ विभाग अलर्ट झाला असून कारवाईचा इशारा दिला आहे.
नाशिक शहरात 1 एप्रिलपासून ही कारवाई सुरू होण्याची शक्यता असून त्याबाबत हालचाली सुरू आहे. त्यामुळे पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.