महापालिकेच्या निवडणुकाही एकत्रित लढणार? महाविकास आघाडीची नेमकी भूमिका काय? संजय राऊत म्हणाले…

आगामी काळातील निवडणुका महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रित लढणार का? याबाबत चर्चा सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नाशिकमध्ये मोठं वक्तव्य केलं आहे.

महापालिकेच्या निवडणुकाही एकत्रित लढणार? महाविकास आघाडीची नेमकी भूमिका काय? संजय राऊत म्हणाले...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 3:54 PM

नाशिक : आगामी काळात लोकसभा, विधानसभा या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढेल अशी आमची भूमिका आहे, असं संजय राऊत यांनी नाशिकमध्ये म्हटलं होतं. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये बैठका सुरू आहेत आणि त्या बैठकांवरून लोकसभा आणि विधानसभेची तयारी केली जात आहे. मात्र यामध्ये जागा वाटपांचा फॉर्मुला आणि महापालिकेच्या निवडणुका एकत्रित लढण्याबाबत स्पष्टता येत नसल्याने संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे. संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलत असतांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित लढाव्या अशी आमची भूमिका असल्याचे म्हंटले आहे. याशिवाय महापालिका निवडणुकीबाबतही भाष्य केलं आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका एकत्रित लढण्याचा आमचा प्रयत्न आहे तशी भूमिका देखील आमच्या पक्षाची आहे. याशिवाय महापालिकेच्या निवडणुका एकत्रित लढण्याचा प्रयत्न असणार आहे.

राज्यातील ज्या महानगर पालिका मोठ्या आहेत तिथे महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढेल अशी आम्ही भूमिका घेऊ असंही संजय राऊत यांनी म्हटले. त्यामुळे राज्यात सत्ता स्थापन केली जात असतांना महाविकास आघाडी स्थापन झाली ती प्रथमच ग्रामीण पातळीवर एकत्रित निवडणुका लढणार आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या दिवसांपासून राज्यांमध्ये येणाऱ्या काळात महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार की तिन्ही पक्ष वेगवेगळी निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू होती. मात्र, ही चर्चा आता अखेर संपणार आहे. महाविकास आघाडी जवळपास लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित लढणार आहे.

तर महापालिकेच्या निवडणुका बघता महत्त्वाच्या महापालिकेवर महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढल्या जाईल अशी ही भूमिका या वेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून घेतली जाईल असे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढण्याच्या तयारीत आहे.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यामध्ये सत्तांतर झाले, सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार हे विरोधी बाकावर बसले. मात्र, आगामी काळातील निवडणुका बघता या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वबळावर लढणार याबाबत पदाधिकारी आणि कार्यकर्ते यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती.

त्यातच आता लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका एकत्रित लढविल्या जातील यावर शिक्कामोर्तब झाला आहे. जागा वाटपाबाबत कुठलाही निर्णय सध्या तरी झाला नसल्याची माहिती अनेक नेते सांगत आहे. मात्र, दुसरीकडे याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.

महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर असताना या निवडणुका देखील महाविकास आघाडी एकत्र लढणार असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तसे संकेत देखील संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलताना दिले आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....