Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का, माजी मंत्र्याची मुलगी भाजपात प्रवेश करणार, राजकीय चर्चेला उधाण

सुभाष देसाई यांच्या मुलाचा शिवसेनेत प्रवेश होऊन काही तास उलटत नाही तोच उद्धव ठाकरे यांना एक मोठा धक्का बसणार आहे. माजी मंत्र्याची मुलगी भाजपात प्रवेश करणार आहे.

ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का, माजी मंत्र्याची मुलगी भाजपात प्रवेश करणार, राजकीय चर्चेला उधाण
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 2:09 PM

नाशिक : माजी मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत आपल्या वडिलांसहित उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिलाय. हा धक्का ताजा असतांनाच उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेले माजी मंत्री बबन घोलप ( Tanuja Baban Gholap ) यांच्या कन्या यांनीही आपल्या वडिलांसहित उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याचे ठरविले आहे. माजी मंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बबन घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप ह्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वी तनुजा घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर तनुजा घोलप या कुठल्या राजकीय पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर त्यांनी स्वतः मी माझ्या कामानिमित्त त्यांची भेट घेतली प्रवेश करण्याचे कारण नाही म्हणून स्पष्ट केले होते.

त्यामुळे तनुजा घोलप या आपल्या वडिलांसहित उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी देऊन कोणत्या पक्षात जाणार याबाबत नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चा होती. आता या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळणार आहे. तनुजा घोलप या राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी पक्ष प्रवेश करणार आहेत.

हे सुद्धा वाचा

नाशिकच्या राजकीय वर्तुळात तनुजा घोलप यांनी आपल्या वडिलांसहित उद्धव ठाकरे यांना धक्का देत असल्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. तनुजा घोलप या आगामी काळात नाशिक देवळाली मतदारसंघातील उमेदवार असण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहेत.

तनुजा घोलप यांचे वडील माजी मंत्री बबन घोलप आणि बंधू योगेश घोलप हे यापूर्वी या मतदारसंघात शिवसेनेच्या माध्यमातून आमदार म्हणून निवडून आले होते. मागील पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे यांनी घोलप यांचा पराभव करून घोलप यांचा गड खेचून आणला होता.

त्यामुळेच आता तनुजा घोलप यांच्याही आमदार होण्याच्या अशा पल्लवीत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे आणि त्यामुळेच तनुजा घोलप यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे घोलप यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

भारतीय जनता पक्षाच्या मुंबई येथील पक्ष कार्यालयात बड्या नेत्यांच्या उपस्थित तनुजा घोलप यांचा प्रवेश होणार आहे. त्यांचा प्रवेश होऊ नये यासाठी घोलप पिता पुत्रांकडून प्रयत्न केले जात आहे. तनुजा घोलप यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते प्रवेश करणार आहे.

याशिवाय आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिवंगत आमदार वसंत पवार यांच्या कन्याही भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे. बारामतीच्या पवार कुटुंबाशी जवळीक असलेल्या नाशिकच्या पवार कुटुंबाने भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

बीड पॅटर्नची पुनरावृत्ती, रस्त्यावर नग्नावस्थेत आढळला मृतदेह
बीड पॅटर्नची पुनरावृत्ती, रस्त्यावर नग्नावस्थेत आढळला मृतदेह.
खोक्याला पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला?
खोक्याला पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला?.
स्वारगेट अत्याचार प्रकरण; दत्ता गाडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
स्वारगेट अत्याचार प्रकरण; दत्ता गाडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
धंनजय मुंडेंचं मंत्रिपद कोणाला मिळणार? अजित पवारांकडून मोठी खेळी
धंनजय मुंडेंचं मंत्रिपद कोणाला मिळणार? अजित पवारांकडून मोठी खेळी.
मल्हार मटन म्हणून तुम्ही देवांचा अपमान करणार का? आव्हाडांचा प्रश्न
मल्हार मटन म्हणून तुम्ही देवांचा अपमान करणार का? आव्हाडांचा प्रश्न.
नाराजीच्या बातम्यावरून सुधीरभाऊंनी गाणंच गायलं, 'तुझसे नाराज नहीं..'
नाराजीच्या बातम्यावरून सुधीरभाऊंनी गाणंच गायलं, 'तुझसे नाराज नहीं..'.
इतिहास शिकून घ्या, मुस्लिमांबद्दलच्या विधानावरून दादांचा राणेंना सल्ला
इतिहास शिकून घ्या, मुस्लिमांबद्दलच्या विधानावरून दादांचा राणेंना सल्ला.
खोक्याच्या अडचणी वाढणार? आणखी 2 गुन्हे दाखल
खोक्याच्या अडचणी वाढणार? आणखी 2 गुन्हे दाखल.
'माझी गॅरंटी घेऊ नका, कारण...'; जयंत पाटलांचा कोणाला मिश्कील टोला?
'माझी गॅरंटी घेऊ नका, कारण...'; जयंत पाटलांचा कोणाला मिश्कील टोला?.
...म्हणून पंकजा मुंडे मस्साजोगला आजपर्यंत गेल्या नाहीत, कारण आलं समोर
...म्हणून पंकजा मुंडे मस्साजोगला आजपर्यंत गेल्या नाहीत, कारण आलं समोर.