मुंडेंच्या कार्यक्रमाला नितीन गडकरी, एकनाथ शिंदे यांना निमंत्रण, ‘त्या’ नेत्याची उपस्थिती नसल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
नाशिक मधील गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक आणि पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळा कार्यक्रमाला राज्यातील एका बड्या नेत्याची अनुपस्थिती असल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
नाशिक : नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथे गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे आणि पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज पार पडत आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री यांच्यासह राज्यातील मुख्यमंत्री यांच्यासह डझनभर नेते उपस्थित आहे. मात्र, यामध्ये एका नेत्याची उपस्थिती असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांना निमंत्रण दिले नाही का? मुद्दामहून निमंत्रण देण्यात आले नाही. याशिवाय त्यांनीच नकार दिला असेल अशा उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहे. दोन एकर क्षेत्रात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा पार पडत आहे.
नांदूर शिंगोटे येथे गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक आणि पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज केले जात आहे. त्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री भारती पवार, पंकजा मुंडे, छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, दादा भुसे यांच्यासह राज्यातील विविध नेते यावेळी उपस्थित आहे.
मात्र, याच कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनुपस्थिती राहिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा केली जात आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना नियमंत्रण का दिले नाही? निमंत्रण देणं मुद्दामहून टाळलं गेलं का? आधीच नियोजित दूसरा कार्यक्रम असल्याने देवेंद्र फडणविस यांनी नकार दिला अशी उलटसुलट चर्चा सुरू आहे.
याच दरम्यान पंकजा मुंडे यांना सातत्याने पक्षात डावललं जात असल्याची भावना असल्याने आयोजकांनी देवेंद्र फडणवीस यांनाच निमंत्रण दिल्याचे टाळले असावे अशी चर्चा केली जात आहे. त्यामध्ये नितीन गडकरी स्वतः असल्याने देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले नसावे असा सुर आवळला जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंकजा मुंडे यांना सातत्याने डावलले जात असल्याने त्यांच्या नाराजीचा अनेकदा चर्चा होत असतात. त्यातच मागील काही वर्षांपूर्वी त्यांना विधानपरिषदेवर आमदारकी दिली जाईल अशी शक्यता असल्याने त्यांना ती संधी न दिल्याने त्यावरून पंकजा मुंडे नाराज असल्याचे समोर आले होते.
मराठवाड्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांचे फोटो लावले नव्हते, त्यावरूनही देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात पंकजा मुंडे यांचे फोटो नाही म्हणून नाराज असल्याची चर्चा छत्रपती संभाजीनगरमध्ये दबक्या आवाजात सुरू होती. मात्र आता पंकजा मुंडे यांनीच फडणवीस यांना निमंत्रण दिले नाही आणि एकप्रकारे धक्का दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.